आ. चंद्रकांतदादा पाटील यांची सीएनसी, व्हीएमसी प्रशिक्षण वर्गास सदिच्छा भेट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोरोनाच्या संकटामुळे जनजीवन विस्कळीत झाले आहे. औद्योगिक क्षेत्रामध्ये सध्या कुशल मनुष्यबळाची आवश्यकता लक्षात घेऊन आर्थिक मंदीच्या काळात विद्यार्थ्यांना रोजगार निर्मितीच्या उद्देशाने विद्या प्रबोधिनी रोजगार मार्गदर्शन केंद्राच्यावतीने मोफत सीएनसी, व्हीएमसी  ऑपरेटिंग प्रशिक्षणाचे आयोजन करण्यात आले आहे. वाय.पी.पोवारनगर येथील श्री इंडस्ट्रीज याठिकाणी सुरु असलेल्या या प्रशिक्षण वर्गास भाजपा प्रदेशाध्यक्ष आ. चंद्रकांतदादा पाटील यांनी सदिच्छा भेट दिली.   
     यावेळी प्रास्ताविकात विद्या प्रबोधिनी संस्थेचे अध्यक्ष राहूल चिकोडे यांनी संस्थेच्या विविध उपक्रमांची माहिती दिली.
    या सीएनसी, व्हीएमसी ऑपरेटिंग प्रशिक्षण वर्गासाठी सहकार्य करणारे भाजपा उद्योग आघाडीचे संयोजक अनंत पेंडसे यांनी व प्रशिक्षक श्री. गुरव यांनी या उपक्रमाबाबत सविस्तर माहिती दिली. या प्रशिक्षण वर्गाच्या माध्यमातून विद्यार्थांना चांगल्या ठिकाणी नोकरी मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे सांगितले. यानंतर उपस्थित विद्यार्थ्यांनी आपले अनुभव कथन करून या कोर्सच्या माध्यमातून अनेक चांगल्या गोष्टी शिकण्यासाठी मिळत असल्याचे सांगितले.
     यावेळी भाजपा प्रदेशाध्यक्ष आमदार चंद्रकांतदादा पाटील यांनी सर्व विद्यार्थ्यांशी संवाद साधताना सध्या औद्योगिक क्षेत्रात होत चाललेल्या मोठ्या बदलाबद्दल व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतील स्किल डेव्हलपमेंट व मेड इन इंडिया याविषयी माहिती दिली. कोरोनाच्या काळात संकटातील संधी लक्षात घेऊन चीन सारख्या देशाला जर औद्योगिक क्षेत्रामध्ये रोखायचा असेल तर मेक इन इंडियाच्या माध्यमातून आत्मनिर्भर होऊन व्यवसाय, उद्योग अशा गोष्टींना प्राधान्य दिले पाहिजे असे सांगितले. यासाठी विद्याप्रबोधिनी संस्थेमार्फत विद्यार्थ्यांना नोकरी व व्यवसायासाठी सर्व प्रकारची मदत केली जाईल, असे विद्यार्थ्यांना त्यांनी आश्वस्त केले.
    कार्यक्रमाचे समन्वयक विजयसिंह पाटील यांनी आभार मानले. याप्रसंगी श्री इंडस्ट्रीजचे अनंत पेंडसे, प्रशिक्षक श्री.परीट यांच्यासह जयदीप मोरे, शंतनु मोहिते, सचिन साळोखे, कृष्णात आतवाडकर यांच्यासह विद्यार्थी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!