मंत्री नारायण राणे यांची धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     केंद्रीय सूक्ष्म, लघु, मध्यम उद्योग मंत्री नारायण राणे रविवारी कोल्हापूर दौर्‍यावर आले होते. मुस्कान लॉन येथील कार्यक्रम झाल्यानंतर मंत्री नारायण राणे यांनी माजी खासदार धनंजय महाडिक यांच्या निवासस्थानी भेट दिली.
     यावेळी श्री. राणे यांच्या पत्नी सौ.निलम राणे उपस्थित होत्या. राणे दाम्पत्याने महाडिक यांच्या घरी स्नेहभोजन केले. राणे परिवार आणि महाडिक कुटुंबीय यांच्यात जुना स्नेह आहे. त्या आठवणींना उजाळा देत आणि महाडिक परिवारातील प्रत्येकाची आस्थेने चौकशी करत, राणे यांनी महाडिक यांच्याशी विविध विषयांवर बातचीत केली.
      यावेळी सौ. अरूंधती महाडिक, पृथ्वीराज महाडिक यांच्यासह महाडिक परिवारातील सदस्य उपस्थित होते.
——————————————————-

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!