आ.सरोज आहिरे यांची गोकुळ दूध संघास सदिच्छा भेट

Spread the love


कोल्‍हापूर • प्रतिनिधी
      कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघास (गोकुळ) सोमवारी  नाशिक येथील देवळाली मतदारसंघाच्या आमदार सरोज बाबूलाल आहिरे यांनी सदिच्‍छा भेट दिली. द
गोकुळचे जेष्ठ संचालक अरुण डोंगळे यांच्‍या हस्‍ते त्‍यांचा सत्‍कार करण्‍यात आला.
       आमदार सरोज आहिरे कोल्‍हापूर जिल्‍ह्याच्‍या दौऱ्यावर आल्या होत्या. त्यावेळी त्यांनी गोकुळ प्रकल्पाची पाहणी केली. गोकुळ दूध संघामार्फत दूध उत्‍पादक शेतकऱ्यांसाठी राबविल्‍या जाणाऱ्या सर्व योजनांची माहिती घेवून व संघामार्फत खासकरून राबवली जाणाऱ्या महिला नेतृत्व विकास या विभागाच्या विविध योजनेबद्दल सविस्तर माहिती घेऊन त्‍यांनी गोकुळ दूध संघाचे कौतुक करुन समाधान व्‍यक्‍त केले. नाशिकमध्ये दुग्ध व्यवसायाला चालना देण्यासाठी गोकुळ दूध संघाने सहकार्य करावे असे मनोगत व्यक केले.
      यावेळी संघाचे संचालक शशिकांत पाटील, कार्यकारी संचालक योगेश गोडबोले, बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, डॉ.प्रवीण वाघ, नितीन जाधव, संदीप ढेकळे उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!