गव्हर्मेंट सर्व्हंटस् बँक निवडणूक: छ.शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेल स्थापन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     येथील राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को.ऑपरेटिव्ह बँकेच्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे. बॅंकेच्या आणि सभासदांच्या विकासासाठी पॅनेलचा जाहिरनामा सादर करण्यात आला. पॅनेल प्रमुख अमित अवसरे व राजाराम गंधवाले यांनी पत्रकार परिषदेत जाहिरनामा प्रसिद्ध केला.
    यावेळी राजेंद्र सावंत, अनिल सरदेसाई,  तानाजी पाटील, रत्नमाला शिंदे, मीनाशी शिंदे, प्रदिप कलकुटकी, संभाजी पोवार, उमेश सावंत, प्रकाश महाडेश्वर, दत्ता सुतार, श्रीकांत कोरवी,अमर वेटाळे यांच्यासह पॅनलचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.
     राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को. ऑपरेटिव्ह बॅंकेची पंचवार्षिक निवडणूक येत्या डिसेंबर महिन्याच्या अखेरीस होण्याची शक्यता आहे. या निवडणुकीसाठी कै.भास्करराव जाधव व कै. छन्नुसिंग चव्हाण यांच्या विचाराने आणि विश्वासराव माने यांच्या समर्थ साथीने बॅंकेमध्ये बदल घडवणे व विकास करण्यासाठी पॅनेलची स्थापना करण्यात आली आहे. जाहिरनाम्यातील मुद्यांचे पालन करून बॅंकेच्या आणि सभासदांच्या हिताचा कारभार केला जाईल, असे आश्वासन पॅनेलप्रमुखांनी दिले. 
                  जाहिरनाम्यातील काही मुद्दे…..
• वयाच्या ५५ व्या वर्षापुढील ज्या कर्मचाऱ्यांना सक्तीने सेवानितृत्त केले आहे, असे कर्मचारी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन त्यांनी लढा दिला आहे, अशा कर्मचाऱ्यांना सुप्रिम कोर्टाच्या आदेशानुसार न्याय देऊ.
• बँक आपल्या दारी या संकल्पनेतून सभासद नोंदणी, कर्ज वेळेवर देण्यास प्राधान्य. 
• बँकेच्या सदस्यांच्या सहमतीने सुसज्ज इमारत उभारणे.
• विम्यासह कर्ज तात्काळ उपलब्ध करुन देणार, जेणेकरून कर्जदाराच्या वारसांवर व जामीनदारांवर त्याचा कोणताही परिणाम होणार नाही.
• गृहकर्ज उपलब्ध करून देणार.
• बॅंकेतील नोकर भरतीसाठी सभादसांच्या पाल्यांचा प्राधान्याने विचार.
• कर्जावरील व्याजदर कमी करणार तसेच ठेवींवर आकर्षक व्याज देणार.
• स्वच्छ व पारदर्शी कारभार करणार.
——————————————————- Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!