दूध पावडरसाठी अनुदान देणार: दुग्‍धविकास मंत्री सुनिल केदार

Spread the love

 
कोल्हापूर • प्रतिनिधी
     राज्यात सरासरी ५० लाख लिटर दूध शिल्लक राहत आहे. याचा दूध संघांना आर्थिक फटका बसत आहे. मात्र गतवर्षीप्रमाणे यंदाही महाविकास आघाडीचे सरकार शिल्लक दुधाच्या पावडरसाठी लवकरच अनुदान देण्यासाठी ठोस पाऊले उचलणार आहे. शिल्लक दुधाचा आढावा घेवून याबाबत लवकरच निर्णय घेणार असल्याची माहिती दुग्धविकास मंत्री सुनिल केदार यांनी दिली.
      मंत्री सुनिल केदार गुरुवारी कोल्हापूर दौऱ्यावर आले होते. यावेळी शासकीय विश्रामगृहात येथे सायंकाळी त्यांचे आगमन झाले. यावेळी गोकुळचे संचालक प्रकाश पाटील व रयत संघाचे संचालक सचिन पाटील यांनी मंत्री सुनिल केदार यांचे पुष्पगुच्छ देवून स्वागत केले. दुग्‍ध व्‍यवसायासमोर असणाऱ्या अडी-अडचणीबाबत व संघाच्‍या प्रलंबित असणाऱ्या विविध प्रस्‍तावांना मंजुरी मिळणेबाबत संघाच्‍या मागण्याचे निवेदन दिले.
     यावेळी गोकुळचे डेअरी व्यवस्थापक ए.वाय.चौधरी, संघाचे बोर्ड सेक्रेटरी एस.एम.पाटील, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील आदि उपस्थित होते

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!