पालकमंत्र्यांकडून पहाटे प्रत्यक्ष भेटून वृत्तपत्र विक्रेत्यांना शुभेच्छा

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त साजरा करण्यात येणाऱ्या वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी शुक्रवारी (दि.१५) कोल्हापुरातील वृत्तपत्र विक्रेत्यांना पुष्प देऊन त्यांच्या प्रती कृतज्ञता व्यक्त केली.
      भारताचे माजी राष्ट्रपती डॉ. ए. पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त वृत्तपत्र विक्रेता दिन साजरा केला जातो. या वृत्तपत्र विक्रेता दिनाचे औचित्य साधून पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी पहाटे कोल्हापुरातील एसटी स्टॅण्ड, रेल्वेस्थानक यासह शहरातील विविध ठिकाणच्या वृत्तपत्र स्टॉलवर जाऊन वृत्तपत्र विक्रेत्यांना प्रत्यक्षात भेटून त्यांना शुभेच्छा दिल्या.  ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न करता आपल्या घरी दररोज सकाळी जगाची बातमी पोहोचवणाऱ्या वृत्तपत्र विक्रेत्यांना पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी प्रत्यक्ष भेटून शुभेच्छा दिल्याबद्दल वृत्तपत्र विक्रेत्यांनीही याबद्दल समाधान व्यक्त केले.
      तर नामदार सतेज पाटील यांनी वृत्तपत्र विक्रेता दिनानिमित्त प्रत्येकवर्षी न चुकता वृत्तपत्र विक्रेत्यांना शुभेच्छा देऊन आस्था दाखविल्याबद्दल वृत्तपत्र विक्रेतेही भारावून गेले. यावेळी महाराष्ट्र राज्य वृत्तपत्र संघटनेचे सचिव रघुनाथ कांबळे, शैलेश कांबळे, शामराव शिंदे, सुकुमार बेले, विजय शिंदे आदींसह जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!