कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा सहकारी दूध उत्पादक संघ (गोकुळ) च्यावतीने ताराबाई पार्क येथील कार्यालयात महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्य गोकुळचे चेअरमन विश्वास नारायण पाटील, संचालक व अधिकारी यांच्या उपस्थितीत छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याचे पूजन करण्यात आले.
शिस्तबद्ध लष्कर व सुसंघटित प्रशासकीय यंत्रणेच्या बळावर छत्रपती शिवाजी महाराजांनी एक सामर्थ्यशाली आणि प्रागतिक स्वराज्य उभे केले. गेली चारशे वर्षे महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण जगाला वेळोवेळी विविध माध्यमातून सामजिक, सार्वजनिक, राजकिय जीवनामध्ये शिवचरित्र आणि शिवविचारच मार्गदर्शक ठरत आहेत. गोकुळ परिवातील सर्वांनी शिवाजी महाराजांचे आचार-विचार आचरणात आणावेत, यामुळे संस्था बळकटीकरणास नक्कीच मदत होईल असे मनोगत चेअरमन विश्वास पाटील यांनी व्यक्त केले.
याप्रसंगी जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, व संचालक अजित नरके यांनीही मनोगत व्यक्त केले. आभार संकलन सहा. व्यवस्थापक बी.आर. पाटील यांनी मानले. सूत्रसंचालन एम.पी.पाटील यांनी केले.
यावेळी विभागीय उप.आयुक्त राज्य उत्पादन शुल्क कोल्हापूर यशवंत पवार, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, संभाजी पाटील, अंबरिषसिंह घाटगे, डेअरी व्यवस्थापक अनिल चौधरी, पशुसंवर्धन व्यवस्थापक डॉ. यु.व्ही.मोगले, संकलन व्यवस्थापक एस.व्ही. तुरंबेकर व संघाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.