कोल्हापूर • प्रतिनिधी
कोल्हापूर जिल्हा केमिस्ट असोसिएशनच्या अध्यक्षपदी निवड झाल्याबद्दल शिवाजी सखाराम ढेंगे यांचा गोकुळच्यावतीने सत्कार करण्यात आला. गोकुळ संचालकांच्या बैठकीत संघाचे चेअरमन विश्वास पाटील हस्ते करण्यात आला. तसेच संघाचे सेवानिवृत्त कर्मचारी माधव कसरकर यांचा सत्कार संचालक बाबासाहेब चौगले तर मोतीराम डोईफोडे यांचा सत्कार संचालक चेतन नरके यांच्या हस्ते करण्यात आला.
याप्रसंगी संघाचे चेअरमन विश्वास पाटील, संचालक अरूण डोंगळे, अभिजित तायशेटे, अजित नरके, नविद मुश्रीफ, शशिकांत पाटील–चुयेकर, किसन चौगले, रणजितसिंह पाटील, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, सुजित मिणचेकर, अमरसिंह पाटील, बयाजी शेळके, अंबरिषसिंह घाटगे, बाळासो खाडे, चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, सौ.शौमिका महाडिक, कार्यकारी संचालक डी.व्ही.घाणेकर, बोर्ड सेक्रटरी एस.एम.पाटील व संघाचे अधिकारी उपस्थित होते.