छत्रपती शिवरायांच्या पुतळ्यास अभिवादन
कोल्हापूर • प्रतिनिधी
शिवाजी विद्यापीठाच्या प्रांगणातील छत्रपती शिवाजी महाराजांच्या भव्य अश्वारुढ पुतळ्यास आज सकाळी ११ वाजता कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के, प्र-कुलगुरू डॉ. पी.एस. पाटील यांच्यासह अधिकारी, शिक्षकांनी पुष्प वाहून अभिवादन केले.
यावेळी कुलसचिव डॉ. विलास नांदवडेकर, वित्त व लेखाधिकारी व्ही.टी. पाटील, परीक्षा व मूल्यमापन मंडळाचे संचालक जी.आर. पळसे, अधिष्ठाता डॉ. एस.एस. महाजन, अंतर्गत गुणवत्ता हमी कक्षाचे संचालक डॉ. एम.एस. देशमुख, विद्यार्थी विकास मंडळाचे संचालक डॉ. आर.व्ही. गुरव, राष्ट्रीय सेवा योजनेचे समन्वयक अभय जायभाये, रोजगार व उद्योजकता विकास केंद्राचे संचालक डॉ. ए.एम. गुरव, क्रीडा विभाग प्रमुख डॉ. पी.टी. गायकवाड, डॉ. पी.एन. वासंबेकर, डॉ. ए.एम. सरवदे आदी उपस्थित होते. यावेळी राष्ट्रगीत व महाराष्ट्र गीत यांचे सामूहिक गायन करण्यात आले