ग्रीस देशाचे आईस्क्रीम, पुडींग व डेझर्टस् आता कोल्हापूरात


कोल्हापूर • प्रतिनिधी
    दर्जेदार खाद्य उत्पादन, खाद्य संस्कृती तसेच दूध आणि दुग्धजन्य पदार्थांसाठी जगप्रसिद्ध असणाऱ्या ग्रीस देशाचे आईस्क्रीम,पुडींग,डेझर्टस् व स्नॅक्स आता भारतात प्रथमच तेही कोल्हापूरमध्ये उपलब्ध होत असल्याची माहिती सत्यजीत पाटणकर व दत्तात्रय शिळीमकर यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी जॉर्जिअस सिरीनॉअस, ऑथलांसिअस कौतुहान्स, निकोलस कौकीघास, विक्रांत शिळीमकर उपस्थित होते.
     ग्रीस येथील उद्योजक आणि योगर्ट तज्ञ जॉर्जिअस सिरीनॉअस, ऑथलांसिअस कौतुहान्स व निकोलस कौकीघास या उद्योजकांनी ” ग्रीसानिया ” या कंपनीची सुरूवात पुणे – बेंगलोर राष्ट्रीय महामार्ग क्रमांक २४, मॅकडोनाल्डच्या नजिक, सरनोबतवाडी कोल्हापूर येथे केली आहे. भारतात प्रथमच सुरू झालेल्या या कंपनीचे सत्यजीत पाटणकर व दत्तात्रय शिळीमकर हे संचालक आहेत.
         ग्रीसानियाची वैशिष्ट्ये
     आईस्क्रीमचे निरनिराळे फ्लेवर्स, योगर्ट, व्हेज पुडींग सॉसेस, मिल्क क्रीमपासून बनविलेली आरोग्यदायी उत्पादने आहेत.’ Make your own ice- cream ‘ या कल्पनेला प्रत्यक्षात आणणारे ग्रीसानिया! स्वत:च आईस्क्रीम बनविण्याचा अनुभव – सोबत फ्लेवर्स आणि ग्रीसानियाचे तज्ञ.आठवड्याला बदलणारे फ्लेवर्स हे वैशिष्ट्ये आहेत. परदेशी तंत्रज्ञान असूनही योग्य दर आहेत.
………………………………………….. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *