केडीसीए व शासकीय तंत्रनिकेतन कॉलेज यांच्यावतीने मैदान सपाटीकरण काम सुरू

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन (केडीसीए) व शासकीय तंत्रनिकेतन  यांच्यामध्ये झालेल्या समझोता करारानुसार शासकीय तंत्रनिकेतन कॉलेच्या मैदानाचे सपाटीकरण व किकेट विकेट तयार करण्याच्या कामाचा नुकताच शुभारंभ करण्यात आला. शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजचे प्राचार्य प्रशांत पट्टलवार व केडीसीएचे अध्यक्ष चेतन चौगुले यांच्या हस्ते कामाचा शुभारंभ झाला.
     शासकीय तंत्रनिकेतन कॉलेजच्या मैदानाचा विकास करून त्याचा उपयोग केडीसीए बरोबर जिल्हयातील मुले व मुलींना क्रिकेटमधील नैपुण्य मिळविण्यासाठी व्हावा या उद्देशाने कोल्हापूर जिल्हा क्रिकेट असोसिएशन व शासकीय तंत्रनिकेतन यांच्यामध्ये एक सामंजस्य करार करण्यात आला आहे.
     मैदान सपाटीकरणासाठी अर्थमुव्हर्स मशिनरी ओनर्स असोसिएशनचे अध्यक्ष रविंद्र पाटील (सडोलीकर) यांनी बुलडोझर विनामुल्य उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांचे असोसिएशन व शासकीय तंत्रनिकेतनमार्फत   सत्कार करण्यात आला.
      या कार्यक्रमांला शासकीय तंत्रनिकेतनचे प्राध्यापक डॉ. दत्तात्रय गर्गे, प्रफ्फुल खेडकर,   अरूण हत्ती, केडीसीएचे उपाध्यक्ष रमेश हजारे, सचिव केदार गयावळ, खजानिस अभिजीत भोसले, अजित मुळीक, कृष्णा धोत्रे, नंदकुमार बामणे, विजय सोमाणी, नितीन पाटील, किरण रावण, युवराज पाटील आदी उपस्थित होते

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!