• सीपीआर हॉस्पिटलच्या वर्ग ४ कर्मचाऱ्यांचा पाठींबा
कोल्हापूर • प्रतिनिधी
येथील राजर्षी शाहू गव्हर्मेंट सर्व्हंटस को-ऑपरेटिव्ह बँकेच्या निवडणुकीसाठी छत्रपती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलने निवडणूक रिंगणात आहे. या पॅनेलला बॅंकेच्या सभासद मतदारांचा पाठींबा वाढत आहे. सीपीआर हॉस्पिटलच्या वर्ग ४ कर्मचाऱ्यांनीही ‘युवाशक्ती विकास पॅनल’ला पाठींबा दिला आहे.
मौजे कणेरी येथील सेवानिवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांनी छत्रपाती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेलला जाहीर पाठिंबा दिला आहे. त्याचबरोबर सुरेंद्र कांबळे मुकादम यांच्यासह सीपीआर हॉस्पिटल वर्ग ४ कर्मचाऱ्यांनी जाहीर पाठींबा दिला आहे. छत्रपती शिवाजी महाराज युवाशक्ती विकास पॅनेल प्रमुख अमित अवसरे, अनिल सरदेसाई, राजेंद्र सावंत, अमर वेठाळे, उमेश सावंत यांनी सीपीआर हॉस्पिटलमध्ये प्रचारादरम्यान बँकेचे मतदार असलेल्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली तेव्हा या कर्मचाऱ्यांनी पॅनेलला जाहीर पाठींबा व्यक्त केला आहे. यावेळी सीपीआर हॉस्पिटलच्या कर्मचाऱ्यांच्या अडीअडचणी सोडविण्यास आम्ही कटिबध्द असल्याचे आश्वासन पॅनेल प्रमुख अनिल सरदेसाई, अमित अवसरे, राजेंद्र सावंत यांनी दिले.
——————————————————-