पालकमंत्री साधणार उद्या ऑनलाईन संवाद

 
कोल्हापूर • ( जिमाका )
     कोरोना आजार प्रतिबंधात्मक उपाययोजनेच्या अनुषंगाने लहान मुलांना होणार्‍या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर  ० ते १८ वर्षे वयोगटातील  बालकांच्या/विद्यार्थ्यांच्या  शिक्षकांचे व  पालकांचे https://youtu.be/BY20UBRIHPY या युट्यूब लिंकद्वारे जिल्ह्याचे पालकमंत्री सतेज पाटील हे आमदार जयंत आसगांवकर, जिल्हाधिकारी दौलत देसाई, जिल्हाधिकारी कोल्हापूर व सी.पी.आर. रुग्णालयातील बालरोग विभाग प्रमुख आदी मान्यवर रविवार दि.३० मे रोजी सकाळी १० वा. संवाद साधणार आहेत .
     या मार्गदर्शन सत्रासाठी कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व शासकीय व खासगी महाविद्यालयातील प्राचार्य, प्राध्यापक, शासकीय व खासगी शाळांचे मुख्याध्यापक, शिक्षक, अंगणवाडी सेविका, बालवाडी शिक्षिका व बालकांच्या आणि विद्यार्थ्यांच्या पालकांनी वर नमुद केलेल्या लिंकद्वारे online उपस्थित राहावे असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *