पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली भुईबावडा घाटाची पाहणी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
    गगनबावडा दौऱ्यावर असलेले पालकमंत्री सतेज पाटील यांनी, भुईबावडा घाट येथे पाहणी केली. अतिवृष्टीमुळे  घाटातील दरड कोसळण्याची घटना घडत आहेत तर  घाटरस्ता देखील खचला आहे. यामुळे भुईबावडा घाटातून तळकोकणाकडे  जाणारी वाहतूक बंद आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री सतेज पाटील यांनी या ठिकाणी भेट देऊन पाहणी केली.        
     रस्ता खचण्याच्या घटना घडत असल्याने, रस्त्याच्या बाजूने सुरक्षा कठडे काँक्रेटीकरण करण्याबरोबरच या ठिकाणचे रस्ते काँक्रेटीकरण करण्याच्या सूचना पालकमंत्री सतेज पाटील यांनी केल्या. अतिवृष्टीने रस्ते खचत असल्याने, पुन्हा अशा घटना घडू नयेत यासाठी त्याचा मास्टर प्लॅन तयार करा, अशा सूचनाही त्यांनी केल्या आहेत.
      यावेळी करवीरचे उपविभागीय अधिकारी वैभव नावडकर, तहसीलदार संगमेश कोडे, वैभववाडी तहासिलदार रामदास झलके, सार्वञानिक बांधकाम विभाग उपअभियंता कुलकर्णी, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष बजरंग पाटील, जिल्हा परिषद सदस्य भगवान पाटील, डी. वाय. पाटील साखर कारखान्याचे संचालक मानसिंग पाटील, उदय देसाई, गगनबावडा सभापती संगीता पाटील, गोकुळचे संचालक बयाजी शेळके, पंचायत समिती सदस्या मंगल कांबळे, पांडुरंग भोसले, सरपंच दगडू भोसले, सहदेव कांबळे, चंद्रकांत खानविलकर, संभाजी पाटणकर, सार्वजनिक बांधकाम अधिकारी सारिका कुलकर्णी – जाधव, विभागीय वन अधिकारी सुधीर सोनवणे, विभागाचे कार्यकारी अभियंता संजय काटकर, गगनबावडा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक रणजित पाटील,  पी. डी. जाधव, बंडाआप्पा पडवळ, दादू पाटील आदी उपस्थित होते.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!