पालकमंत्री सतेज पाटील यांनी केली बांधावर जाऊन पूरबाधीत शेतीची पाहणी

Spread the love

  कोल्हापूर • प्रतिनिधी
      करवीर तालुक्यातील वळिवडे आणि  चिंचवाड गावातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन पूरबाधित शेतीची पालकमंत्री सतेज पाटील यांनी पाहणी केली. तसेच नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला. त्यांच्यासमवेत यावेळी आमदार ऋतुराज पाटील होते.
     जुलै महिन्यामध्ये पंचगंगा नदीला आलेल्या महापूरामुळे नदीकाठावरील शेतीचे प्रचंड नुकसान झालेले आहे. करवीर तालुक्यातील वळीवडे गावातील सुमारे ३५० हेक्टर तर चिंचवाड गावातील ३२५ हेक्टर शेती पाण्याखाली जाऊन पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. पालकमंत्री सतेज पाटील आणि आमदार ऋतुराज पाटील यांनी आज वळिवडे आणि चिंचवाड गावातील पूरग्रस्त शेतकरी बांधवांच्या बांधावर जाऊन पूरबाधित शेतीची पाहणी करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांशी संवाद साधला.
     पुरबाधित क्षेत्रातील शेतकरी आणि ग्रामस्थांना सर्वतोपरी मदत करण्यासाठी जलदगतीने पंचनामे करण्याबाबतच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना देण्यात आल्या असून एकाच घरात दोन चुली असल्यास अशा कुटुंबाचे दोन स्वतंत्र पंचनामे करण्याबाबत प्रशासनाला सूचित करण्यात आले आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!