श्रीमंत शाहू महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त केएसएला जिम्नॅस्टिक्स्‌ साहित्य प्रदान


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्हापूर स्पोर्ट्स असोसिएशनचे पेट्रन-इन्‌ चीफ्‌ श्रीमंत शाहू छत्रपती महाराज यांच्या वाढदिवसानिमित्त केएसए जिम्नॅस्टिक विभागाला जिम्नॅस्टिक्सचे साहित्य देण्यात आले.
      केएसएचे अध्यक्ष व विफाचे उपाध्यक्ष श्रीमंत मालोजीराजे छत्रपती आणि ऑल इंडिया फुटबॉल फेडरेशन वुमन्स कमिटी मेंबर , विफा महिला समिती चेअरमन व केएसए पेट्रन मेंबर सौ. मधुरिमाराजे छत्रपती यांच्याकडून  दोन लाख वीस हजार रुपये किंमतीचे बॅलन्सींग बीम, वॉल्टिंग टेबल व दोन स्प्रिंग बोर्ड असे साहित्य  जिम्नॅस्टिक्स्‌ विभागासाठी देण्यात आले.
      श्रीमंत मालोजीराजे छत्रपती यांच्या हस्ते या साहित्यांचे पूजन करण्यात आले. यावेळी मालोजीराजे छत्रपती यांनी मनोगत व्यक्त केले. त्यांनी केएसएच्या जिम्नॅस्टिक्स्‌ प्रशिक्षण वर्गातून राष्ट्रीय पातळीवर खेळलेल्या खेळाडूंचा उल्लेख केला. जिम्नॅस्टिक्स्‌ हा व्यायाम प्रकार सर्व खेळांसाठी मुलभूत असल्यामुळे तिला खेळांची जननी म्हणून ओळखण्यात येते. या विभागातून जिल्हा, राज्य, राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय जिम्नॅस्ट्‌स्‌ निर्माण होणेसाठी योग्य असे प्रयत्न करू व त्यासाठी आवश्यक ते सहकार्य करण्याचे आश्वासन दिले.
      या समारंभावेळी केएसएचे पदाधिकारी दिपक शेळके, माणिक मंडलिक, राजेंद्र दळवी, नंदकुमार बामणे,प्रा.अमर सासने, नितीन जाधव, संभाजीराव पाटील-मांगोरे, दिग्विजय राजेभोसले, संग्रामसिंह यादव,मनोज जाधव, विश्र्वंभर मालेकर-कांबळे, संजय पोरे, दिपक राऊत, प्रणिल इंगळे प्रशिक्षक संजय तोरस्कर व महापालिका उपशहर अभियंता बाबुराव दबडे उपस्थित होते.             ऑन.जनरल सेक्रेटरी माणिक मंडलिक यांनी उपस्थितांचे स्वागत करून प्रास्ताविक केले तर दिग्विजय राजेभोसले यांनी आभार मानले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *