“आरोग्य निर्भर” कोविड केअर हॉस्पिटलची वैद्यकीय क्षेत्रात अनुकरणीय दखल


कोल्हापूर • प्रतिनिधी
     संपूर्ण जगाने आणि आधुनिक वैद्यकीय उपचार प्रणालीने जवळजवळ हात टेकलेले असताना नेहमीच्या वैद्यकीय उपचारांबरोबर आरोग्य निर्भर (ए.एन. २.०) ही मेडिकल न्यूट्रीशनथेरपी वापरल्यास रुग्ण लवकर बरे होण्याची शक्यता वाढते. तसेच आजाराचा कालावधीही कमी होतो असे प्रतिपादन संकल्प ह्यूमन रिसोर्स डेव्हलोपमेंट कोर्पोरेशन लि.चे संचालक आणि सुप्रसिद्ध फॅमिली फिजिशियन डॉ. पी. एन. कदम यांनी केले.
     “इम्म्युनोथेरपी” चा गेली १२ वर्ष करत असलेला अभ्यास आणि वैद्यकीय क्षेत्रातील ३५ वर्षाचा प्रदीर्घ अनुभव यातून त्यांनी तज्ञ सहकाऱ्यांसोबत “आरोग्य निर्भर” या इम्युनिटी सिक्वेन्सची निर्मिती केली आहे. यातील ए.एन. २.० हा कोविड-१९ची लागण झालेली असताना द्यावयाचा “पूरक आहार औषधी” म्हणून कसा कार्य करतो त्याचे शास्त्रशुद्ध विवेचन त्यांनी दिले आहे. कोरोना विषाणूचा प्रभाव आणि प्रजनन वेगाने कमी होणे ऑक्सिजन पातळीमध्ये लक्षणीय वाढ होणे किंवा स्थिर होणे तसेच प्रचलित इंजेक्शनच्या वापरामुळे होणारे ‘ॲसिडोसिस’ नियंत्रणात ठेवून गुंतागुंत कमी करणे असे सकारात्मक परिणाम करणारे नैसर्गिक घटक आणि क्लोरोलाइफ याविषयी माहिती घेऊन सर्वच डॉक्टर्स आणि मोठ्या हॉस्पिटलनी याचा रुग्णांना लाभ करून द्यावा असे आवाहन संकल्पाच्या संचालिका डॉ. अपूर्वा अहिरराव यांनी केले.
      एच.आर.सी.टी स्कोर आणि रुग्णाची ऑक्सिजनची पातळी यानुसार एक ‘प्रोटोकॉल’ तयार करण्यात “संकल्प” टीमला यश आले असून “सायटोकाईन स्टॉर्म” मध्ये रुग्ण जाऊ न देणे आणि शरीरद्रव्यांना अल्कलाईन वातावरणात ठेवल्यास चयापचय क्रिया (मेटाबॉलिझम) प्रतिकार शक्तीस मदत करते या शास्त्रीय तत्वावर कोणत्याही प्रकारची घातक रसायने स्टिरॉईड्स न वापरता निसर्गातील सूक्ष्म आहार तत्वाचा औषधी म्हणून प्रभावी वापर करणे शक्य आहे हे डॉ. कदम यांनी आवर्जून सांगितले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *