कोल्हापूर • प्रतिनिधी
संस्कारा हिअरिंग सोल्यूशन्स या मुंबईतील हिअरिंग क्लिनिक्सच्या प्रख्यात साखळीने सिवेन्टोस इंडिया प्रायव्हेट लिमिटेडसोबत सहयोगाने कोल्हापूरात शॉप नंबर ५, श्री सिद्धिविनायक अपार्टमेन्ट, सी टी सी नंबर २३३, प्लॉट नंबर १२ व १३, सर्व्हे कॉलनी , ताराबाई पार्क, ई वॉर्ड, कोल्हापूर येथे अत्याधुनिक केंद्राचे उद्घाटन माजी क्रिकेटपटू पद्मश्री सय्यद किरमाणी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी किशालया चक्रवर्ती, पियुष जैन, अविनाश पवार, कुमार वासानी, सौ. रुपाली वासानी आणि रोहित छाब्रा हे उपस्थित होते.
हे अत्याधुनिक केंद्र आधुनिक काळातील हिअरिंग केअर केंद्राचे प्रतिरूप आहे, जे श्रवणदोषासाठी दर्जात्मक हिअरिंग केअर सोल्यूशन्स देते. कोल्हापूरमधील संस्कारा केंद्र ऑडिओमेट्री, टायम्पेनोमेट्री व ओएई यासारख्या व्यापक ऑडिओलॉजिकल सेवांसोबत हिअरिंग एड ट्रायल ॲण्ड फिटिंग, हिअरिंग एड प्रोग्रामिंग, सर्विसिंग, स्पेअर्स व ॲक्सेसरीज इत्यादी सुविधादेखील देईल. कोणत्याही व्यक्तीला कोणत्याही वयामध्ये श्रवणदोषाचा त्रास होऊ शकतो, म्हणूनच या आजाराकडे त्वरित लक्ष देणे गरजेचे आहे.
सिवन्टोस इंडिया प्रा. लि. चे मुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश पवार म्हणाले की, सिवन्टोस इंडियाला कोल्हापूरकरांना साऊंड क्वॉलिटी व कनेक्टीव्हीटी देण्याचा आनंद होत आहे. ज्यामुळे युजर्सना त्यांच्या वैयक्तिक श्रवण अनुभवावर उत्तम नियंत्रण ठेवता येईल. आम्ही सातत्याने नवीन तंत्रज्ञान सोल्यूशन्ससोबत प्रगत डिजिटल उत्पादने सादर करत आहोत, जे युजरला त्यांच्या गरजांशी सानुकूल असा उच्च दर्जाचा श्रवण अनुभव देतात.
माजी क्रिकेटपटू पद्मश्री सय्यद किरमाणी म्हणाले की, श्रवणदोष कोणालाही आणि कोणत्याही वयामध्ये होऊ शकतो. पण यामुळे कोणीही सामान्य जीवन जगण्यापासून वंचित राहता कामा नये. नवीन तंत्रज्ञान-सक्षम सिग्निया श्रवणयंत्र अशा लोकांची श्रवण क्षमता वाढवू शकतात आणि त्यांना त्रासमुक्त जीवन जगण्याचा आत्मविश्वास देऊ शकतात.
संस्कारा हिअरिंग सोल्यूशन्सचे संचालक कुमार वासानी म्हणाले की, कोल्हापूरमध्ये केंद्राचे उद्घाटन हे आजच्या काळातील सर्व वयोगटातील युजर्सच्या वाढत्या गरजांची पूर्तता करण्यासाठी नाविन्यपूर्ण हिअरिंग सोल्यूशन्स देण्याप्रती आणखी एक पाऊल आहे. संस्कारामध्ये पात्र ऑडिओलॉजिस्ट्स लक्षणे, चिन्हांची तपासणी करण्यामध्ये मदत करतील, चाचण्या करतील आणि सोल्यूशन्स देतील, ज्यामुळे श्रवणदोष अधिक वाढण्याला प्रतिबंध होण्यासोबत लोकांना उत्तमरित्या संवाद साधण्यास मदत होईल. श्रवणदोषाचे लवकर निदान झाले पाहिजे आणि त्याचे घातक परिणाम टाळत उत्तम निष्पत्तींसाठी त्वरित उपचार केले पाहिजेत