प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण यावर प्राप्त हरकतींवर गुरुवारी सुनावणी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
       प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण यावर प्राप्त हरकतींवर गुरुवारी (दि.२१) सुनावणी होणार आहे.
       कोल्हापूर महानगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणूक २०२०-२१ करीता राज्य निवडणूक आयोगाने दिलेल्या कार्यक्रमानुसार महापालिकेमध्ये दि.२३ डिसेंबर २०२० ते ४ जानेवारी २०२१ या कालावधीमध्ये हरकती व सुचना मागविण्यात आल्या होत्या. यामध्ये आरक्षण याबाबत एकूण ३० तक्रारी प्राप्त झाल्या असून प्रारुप प्रभाग रचना यावर ३० तक्रारी प्राप्त झालेल्या आहेत. याबाबतचा अहवाल राज्य निवडणूक आयोगास दि.६ जानेवारीला सादर करण्यात आला आहे.
        सदर प्राप्त प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण, हरकती व सूचना यावर सुनावणी देण्याकरीता राज्य निवडणूक आयोगाकडून साखर आयुक्त पुणे शेखर गायकवाड यांना प्राधिकृत करण्यात आले आहे. त्यांच्या उपस्थितीत विभागीय आयुक्त कार्यालयाकडील उपायुक्त संतोष पाटील व राज्य निवडणूक आयोगाकडील उपायुक्त अविनाश सनस व अव्वर सचिव अतुल जाधव यांच्यासमोर प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या समवेत सुनावणी होणार आहे.
      या अनुषंगाने महानगरपालिकेने ताराबाई पार्क मुख्य निवडणूक कार्यालय येथे गुरुवार, दि. २१ जानेवारी २०२१ रोजी सकाळी १० ते १२:३० या वेळेत प्रभाग रचना यावर प्राप्त हरकती व सूचना तसेच दुपारी २ ते ४:४५ या वेळेत प्रभाग आरक्षण हरकती व सुचनावंर सुनावणी घेण्याचे नियोजन केले आहे. तसेच संबंधीत हरकतदार यांना लेखी पत्राद्वारे तारीख व वेळ कळविण्यात आली आहे

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!