प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण संदर्भात दाखल झालेल्या हरकती व सूचना यांची २१ला सुनावणी


कोल्हापूर • प्रतिनिधी
      प्रारुप प्रभाग रचना व आरक्षण संदर्भात दाखल झालेल्या हरकती व सूचना यांची गुरुवार दि.२१ जानेवारी रोजी निवडणूक कार्यालय येथे होणार आहे. सदरची सुनावणी साखर आयुक्त शेखर गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली विभागीय आयुक्त सौरभ राव अथवा त्यांचे प्रतिनिधी, जिल्हाधिकारी दौलत देसाई अथवा त्यांचे प्रतिनिधी व प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या समितीसमोर घेतली जाणार आहे.
      महापालिकेची सार्वत्रिक निवडणूक २०२१ च्या अनुषंगाने सोमवार दि.२१ डिसेंबर २०२० रोजी केशवराव भोसले नाट्यगृह येथे आरक्षण सोडत घेण्यात आली होती. यानंतर दि.२३ डिसेंबर ते ४ जानेवारी या कालावधीत सुचना व हरकती मागविण्यात आल्या होत्या. या कालावधीत एकूण ६० हरकती दाखल झाल्या आहेत. या हरकती बाबत राज्य निवडणूक आयोगाला कळविल्यानंतर आयोगाने यासाठी २१ जानेवारी २०२१ रोजी सुनावणी ठेवलेली आहे

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *