मेरी वान्लेस हॉस्पिटलमध्ये हृदयरोग विकाराचे शिबीर संपन्न


कोल्हापूर • प्रतिनिधी
    पश्चिम महाराष्ट्रातील आद्य मिशनरी रेव्हण्वायल्डर गोल्ड यांच्या जन्मदिनानिमित्त कोल्हापूर चर्च कौन्सिलच्यावतीने ११३ वर्ष अखंडित रुग्णसेवेत असणाऱ्या  मेरी वान्लेस हॉस्पिटलमध्ये आज हृदयरोग विकारावरील शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिराला प्रचंड प्रतिसाद लाभला.
    सुप्रसिद्ध हृदयरोग रोग तज्ञ डॉ. संजय देसाई व डॉ.अनूप बारदेस्कर यांनी रुग्णांची तपासणी केली. हृदयविकाराशी निगडीत असणाऱ्या अनेक व्याधींवर यावेळी तज्ञांकडून मार्गदर्शन करून रुग्णांची तपासणी केली.
   सिद्धिविनायक रिसर्च सेंटरद्वारे या शिबिरामध्ये लाभ घेतलेल्या रुग्णांसाठी ईसीण्जी, एअन्जिओग्रफि मोफत करण्यात आली. त्याचप्रमाणे रक्त.लघवी तपासणीसाठी भरघोस सवलत देण्यात आली. सिद्धिविनायक नर्सिंग होमचे समन्वयक योगीराज साखरे यांनी या शिबीराचे नियोजन केले.
शिबिरासाठी कोल्हापूर चर्च कौन्सिलचे सेक्रेटरी रेव्ह.जग्गनाथ हिरवे, रेव्ह. रमेश मोहिते,अॅड डॅनिएल धनवडे, दिनानाथ कदम, उदय बिजापुरकर, समसोन समुद्रे  यांच्यासह चर्चचे अधिकारी,पदाधिकारी, कर्मचारी याचे सहकार्य लाभले. 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *