कोल्हापूर • प्रतिनिधी
डी. वाय. पाटील शैक्षणिक संकुलाचे अध्यक्ष डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आर.के.नगर येथील मातोश्री वृद्धाश्रम येथे नवीन बांधण्यात आलेल्या सभागृहासाठी खुर्च्या प्रदान करण्यात आल्या.
डॉ. संजय डी. पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त दरवर्षी अनेक सामाजिक उपक्रमाचे संयोजन माजी नगरसेवक राजू पसारे व डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयचे अधिष्ठाता डॉ. अमरसिंह जाधव यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात येतात. हे उपक्रम सामाजिक बांधिलकी जपावी तसेच समाजातील दुर्लक्षित गटाला प्रवाहात आणण्यासाठी राबविले जातात. या सामाजिक उपक्रमांतर्गत अखंडितपणे अठरा वर्ष कुष्ठरोग्यांसाठी औषध व फळे वाटप, आरोग्य शिबिरे, अंध विद्यार्थी, वृद्धाश्रम, अवनी संस्था, बालसंकुल यांना मदत केलेली आहे. हीच परंपरा कायम राखत डॉ. संजय डी. पाटील त्यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आर. के. नगर येथील मातोश्री वृद्धआश्रममधील नवीन सभागृहाकरिता खुर्च्यांची गरज ओळखून या आश्रमामधील ज्येष्ठ लोकांसाठी खुर्च्या देण्यात आल्या.
यावेळी वृद्धाश्रमाचे संस्थापक शिवाजीराव पाटोळे, शरद पाटोळे, रोहन पाटोळे तसेच आश्रमातील ज्येष्ठ माता व भगिनी उपस्थित होत्या. या उपक्रमाचे संयोजन राजू पसारे व डॉ.अमरसिंह जाधव यांनी केले.