कोल्हापूर • प्रतिनिधी
महापुरातून सावरताना सध्या लोकांच्यापुढे अनेक समस्या निर्माण झाल्या आहेत. मानवतेच्या भावनेतून कित्येकांनी मदतीचे हात पुढे केले आहेत. शिरोळ तालुक्यातील गावांना महापुराचा प्रचंड फटका बसल्याचे समजल्यावर पुणे येथील काँग्रेसचे युवा नेते अनिल बागुल स्वतः शिरोळ तालुक्यातील जनतेसाठी धावून आले. यामध्ये शिरोळ, कुरुंदवाड, आलास, बुबनाळ, शिरटी, हसूर, घालवाड, नृसिंहवाडी या गावामध्ये मदत पुरविण्यात आली.
अमित बागुल यांच्यामार्फत पूरग्रस्त लोकांना थेट मदत करण्यात येत आहे. लोकांना जीवनावश्यक बाबींचे वाटप करण्यात आले आहे. त्याचबरोबर जिथे जेवण पुरविणे शक्य नाही, अशा भागात अल्पोपहार, अन्नाची पाकिटे व पाणी पुरविण्यात येत आहेत. तसेच सांगली जिल्ह्यातील कणेगाव, भरतवाडी, तुजारपूर या गावात देखील त्यांनी स्वतः जाऊन मदत पुरविली आहे.
अमित बागुल यांच्यासोबत सागर आरोळे, संतोष पवार, धनंजय कांबळे, इम्तियाझ तांबोळी आदीनी पूरग्रस्तांना मदत पुरविली. त्यांच्या या दातृत्वपूर्ण स्वभावाचे सर्वांकडून कौतुक होत आहे.