कोल्हापूर • प्रतिनिधी
साहस हा पाया , ऐतिहासिक वास्तूंचे जतन हे ध्येय उराशी बाळगून कार्यरत असलेल्या हिल रायडर्स अॅडव्हेंचर फौंडशनतर्फे विजयादशमीनिमित्त जुना राजवाडा नगारखान्याच्या कमानीस तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात आले.
करवीरनगरीच्या शौर्यशाली इतिहासाचा साक्षीदार असलेल्या जुना राजवाडा कमानीस गेली ३२ वर्षे सातत्याने विजयादशमीदिनी मंगलमय वातावरणात तांब्याच्या कलशाचे मंगल तोरण बांधण्यात येते. हीच परंपरा कायम राखत रविवारी (दि.२५) विजयादशमीनिमित्त सकाळी नऊ वाजता आयोजित केला गेला. शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरू डॉ. डी.टी. शिर्के यांच्यासह राहुल चिकोडे, विजय देवणे, सन्मती मिरजे, पार्थ शाह, प्रसाद संकपाळ या मान्यवरांच्या हस्ते मंगल कलशाचे तोरण बांधण्यात आले.
कोरोनाच्या महामारीमध्ये अहोरात्र झटून एक योद्धा म्हणून लढलेल्या आरोग्य विभाग, पोलीस दल ,आपत्ती व्यवस्थापन व स्मशानभूमीतील सेवक यांना प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते सन्मानित केले गेले. यावेळी प्रमोद पाटील, विनोद कांबोज, युवराज उर्फ बंडा साळोखे, सूरज ढोली, सागर बगाडे, स्नेहल रेळेकर, जयदीप जाधव, शिवतेज पाटील आदींसह ‘ हिलरायडर्स ‘चे शिलेदार उपस्थित होते.