कोल्हापूर • प्रतिनिधी
पहिले हिंदकेसरी श्रीपती खंचनाळे (वय ८६ ) यांचे सोमवारी पहाटे निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून ते आजारी होते.प्रकृती अस्वस्थ्यामुळे ते कोल्हापुरातील खाजगी रुग्णालयात उपचार घेत होते. खंचनाळे यांचे निधनाचे वृत्त कळताच कुस्ती क्षेत्रात हळहळ व्यक्त झाली.
श्रीपती खंचनाळे हे मूळचे महाराष्ट्र-कर्नाटक सीमेवरील एकसंबा येथील. त्यांनी १९५९ ला पंजाब केसरी बनाता सिंग याला पराभूत करत हिंदकेसरीची गदा मिळवून कोल्हापूर जिल्ह्याचे नाव उज्वल केले. याचवर्षी त्यांनी कराड येथे आनंद शिरगावकर यांना दोन मिनिटांत अस्मान दाखवत महाराष्ट्र केसरी किताब पटकावला. त्यांनी १९५८, १९६२ व १९६५ ला झालेल्या ऑल इंडिया चॅम्पियन स्पर्धाही जिंकल्या.