रंकाळा तलावावर साकारणार हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यान

Spread the love

• पर्यटन विभागाकडून रु.४ कोटी ८० लाखांच्या निधीस मंजुरी
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा ऐतिहासिक रंकाळा तलावाची गेल्या अनेक वर्षात दुरावस्था झाली होती. कोल्हापूर शहरास भेट देणारा प्रत्येक पर्यटक हा रंकाळा तलावास आवर्जून भेट देतो. त्यामुळे या ऐतिहासिक तलावाचे सुशोभिकरण आणि संवर्धन होण्यासाठी निधी मंजूर करण्यासाठी विशेष प्रयत्न केले जात आहे. यास पुन्हा यश मिळाले असून, पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्या आदेशाने पर्यटन विभागाकडून रंकाळा तलाव येथे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यान साकारण्यासाठी रु.४ कोटी ८० लाखांच्या निधीस मंजुरी मिळाली असल्याची माहिती राज्य नियोजन मंडळाचे कार्यकारी अध्यक्ष राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
      दरम्यान, या कामांची निविदा प्रक्रिया लवकरच पार पडणार असल्याची माहितीही राजेश क्षीरसागर यांनी दिली आहे.
   याबाबत माहिती देताना राजेश क्षीरसागर यांनी, कोल्हापूर शहरास इ.स. काळापासून ऐतिहासिक वास्तूंचा वारसा लाभला आहे. श्री अंबाबाई मंदिरासह कोल्हापूर शहरातील ऐतिहासिक रंकाळा तलाव हे देशभरातील लाखो पर्यटकांना आकर्षित करणारे प्रेक्षणीय स्थळ आहे. या तलावाचा इ.स.८०० ते ९०० च्या कालावधीपासूनचा इतिहास पहावयास मिळतो. कोल्हापूर शहराच्या वैभवात भर घालणारा रंकाळा तलाव म्हणजे “कोल्हापूरची चौपाटी आणि कोल्हापूरचा मरीन ड्राईव्ह” म्हणून ओळखला जातो. गेल्या काही वर्षात रंकाळा तलावाची झालेली दुरावस्था आणि संवर्धनासाठी नुकताच नगरविकास विभागाकडून रु.१५ कोटींचा निधी मंजूर करण्यात आला आहे. त्यातील पहिला टप्प्यातील रु.१० कोटीचा निधी महानगरपालिकेस वर्ग करण्यात आला आहे.
      ऐतिहासिक रंकाळा तलावास मंजूर झालेल्या निधीतून आगामी काळात रंकाळा तलावाचे सुशोभिकरण व संवर्धनाचे हितकारक काम होणार आहेत. तर कोल्हापूर शहरात आलेल्या पर्यटकांना विरंगुळ्यासाठी अधिकाधिक सुविधा उपलब्ध करून देणे, अबालवृद्धांसाठी विरंगुळा केंद्र, विकसित उद्यान, योगा केंद्र, पदपथ आदी उपलब्ध करून देणे आवश्यक असल्याने याकडे पर्यटन मंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा करण्यात आला आहे. त्यानुसार कोल्हापूर दक्षिण विधानसभा मतदारसंघातील रंकाळा तलावाच्या भागाकडे हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे जैवविविधता, विरंगुळा उद्यान साकारण्यासाठी रु.४ कोटी ८० लाखांच्या निधीस पर्यटन मंत्री नाम.श्री.आदित्यजी ठाकरे साहेब यांच्या आदेशाने मंजुरी देण्यात आली आहे.
                             उद्यानाचे स्वरूप…..
• फूडकोर्ट – यामध्ये प्रामुख्याने उद्यानास भेट देणाऱ्या पर्यटकांसाठी वाहनतळ आणि अनौपचारिक थांबण्यासाठी जागा सुनिश्चित करण्यात येणार आहे. यासह याठिकाणी खाद्यपदार्थाचे स्टॉल्स उपलब्ध असणार आहेत.
• मत्सालय – रंकाळा तलावातील खणींचा वापर मोठ्या आकाराच्या मत्सपालनासाठी करणेत येणार आहे. यासह याठिकाणी मत्स प्रदर्शन केंद्र उभारण्यात येणार आहे.
• फुलपाखरू उद्यान – यामध्ये विविध प्रजातींच्या फुलपाखरांना आकर्षित करण्यासाठी विविध झाडांची लागवड केली जाणार आहे. यामध्ये औषधी वनस्पतींचीही लागवड केली जाणार आहे.
• विरंगुळा केंद्र – यामध्ये नागरिकांसाठी योगा केंद्र, आध्यात्मिक केंद्र, फुल उद्यान, पक्षी निरीक्षण केंद्र, सेल्फी पॉइंट, मुला-मुलींसाठी स्केटिंग ट्रॅक, खेळणी, पर्यावरणपूरक पाणी निर्गमन यंत्रणा आदी उभारण्यात येणार आहे.
• जैवविविधता उद्यान- यामध्ये फुलझाडे, भाजी, औषधी वनस्पती, मसाल्यांचे पदार्थांच्या वनस्पती तसेच दुर्मिळ वनस्पती भारतातील अन्य ठिकाणाहून आणून त्यांची लागवड केली जाणार आहे. तसेच प्राणी, पक्षी, कीटक यांना फिरण्यासाठी हे एक प्रकारचे घर असणार आहे. 
——————————————————- Attachments area

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!