कोल्हापूर • प्रतिनिधी
येथील मेजर ध्यानचंद हॉकी स्टेडियमवर भारतीय हॉकी संघात निवड झाल्याबद्दल ऐश्वर्या राजेश चव्हाणचा सर्व आजी व माजी खेळाडू, प्रशिक्षक यांच्यातर्फे सत्कार करण्यात आला.
या कार्यक्रमावेळी विजय सरदार साळोखे यांनी पुष्गुच्छ देऊन ऐश्वर्या चव्हाणचे स्वागत केले. याप्रसंगी विजय साळोखे यांनी, आता सुरू असलेल्या हॉकी स्टेडियममधील प्रवेशद्वार किंवा प्रेक्षक गॅलरीला ऐश्वर्याचे नांव देऊ असे आश्वासन दिले. कार्यक्रमास नजीर मुल्ला, जगमोहन भुर्के, अनिल परंदेकर, समीर जाधव, सीताराम अर्दलाकर, प्रदीप पोवार, सुरेखा पाटील, मोहन भांडवले, अनुराधा चव्हाण, मिलिंद शेलार, प्रकाश पैठणकर, प्रशांत गायकवाड तसेच हॉकी प्रशिक्षक रणजीत इंगवले, योगेश देशपांडे, सागर जाधव, संतोष चौगले, योगेश माने यांच्यासह हॉकी खेळाडू उपस्थित होते.
——————————————————