भाजपाच्यावतीने वीजबिलांची होळी


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाविकास आघाडी सरकारकडून वाढीव वीजबिल माफ केले जात नसल्याच्या निषेधार्थ भारतीय जनता पार्टी महाराष्ट्र प्रदेशच्यावतीने संपूर्ण महाराष्ट्रात आज गावपातळीवर व शहराच्या ठिकाणी वीजबिल होळी आंदोलन करण्यात आले. याच धर्तीवर भाजपा कोल्हापूरच्यावतीने मुख्य वीज वितरण कार्यालय, ताराबाई पार्क येथे भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे यांचे नेतृत्वाखाली भाजपा पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये वीजबिलांची होळी करुन सरकारचा तीव्र निषेध करण्यात आला. 
     भाजपा कार्यकर्त्यांनी महाविकास आघाडी सरकार विरोधात घोषणाबाजी केली. महाविकास सरकार आघाडीचा धिक्कार असो, फसवी, खोटी आश्वासने देणाऱ्या सरकारचा धिक्कार असो, वीजबिले माफ झाली पाहिजेत, पलटी सरकारचा धिक्कार असो, भरणार नाही-भरणार नाही वीजबिले भरणार नाही अशा घोषणा यावेळी देण्यात आल्या.  तसेच पदाधिकारी व  कार्यकर्त्यांनी वाढीव वीजबिलांची होळी करून सरकारच्या नावाने शिमगा केला.
     यावेळी जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, सरचिटणीस विजय जाधव,संघटन सरचिटणीस अशोक देसाई यांनी मनोगत व्यक्त केले. याप्रसंगी दिलीप मेत्राणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, चंद्रकांत घाटगे, अमोल पालोजी, राजू मोरे, संजय सावंत, विजय आगरवाल, सचिन तोडकर, दिपक काटकर, दिग्विजय कालेकर, अजित ठाणेकर, विजयसिंह खाडे पाटील, गायत्री राऊत, दिलीप बोंद्रे, प्रग्नेश हमलाई, डॉ.राजवर्धन, भरत काळे, सुशांत पाटील, अभीजीत शिंदे, धीरज पाटील, संजय जासूद, गिरीश साळुंखे, सुशांत पाटील, महादेव बिरजे, प्रवीणसिंह शिंदे, धीरज उलपे, विश्वास जाधव, सचिन आवळे, मामा कोळवणकर, तानाजी निकम, दिनेश पसारे, अतुल चव्हाण, ओंकार खराडे, इक्बाल हकिम, विराज चिखलीकर, सुनील पाटील, शिवाजी जोंधाळ, सुनिता सूर्यवंशी, गौरी जाधव, स्वाती कदम, गौरव सातपुते, निलेश आजगावकर, प्रितम यादव, प्रदीप माने, आदित्य कारंडे, प्रदीप घाडगे, विशाल शिराळकर, विवेक वोरा, विजय गायकवाड, मानसिंग पाटील, नितीन देसाई, संतोष कदम, अमर साठे, सचिन मुधाळे आदींसह भाजपा पदाधिकारी व  कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *