भारतीय जनता युवा मोर्चातर्फे विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकाची होळी

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महाविकास आघाडी सरकारने नुकत्याच झालेल्या अधिवेशनात विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक घाईघाईने मंजूर करून घेतले. विद्यापीठाचे कुलपती यांचे अधिकार कमी करण्याची व वर्षानुवर्षे चालत असलेली रचना मोडून शिक्षणमंत्र्यांना प्र-कुलपती म्हणून अधिकार देण्याचा घाट घातला आहे, म्हणून भारतीय जनता युवा मोर्चाच्यावतीने या काळया विधेयकाची छत्रपती शिवाजी विद्यापीठासमोर होळी करण्यात आली. तसेच सरकारच्या निषेधार्थ घोषणा देऊन हा कायदा रद्द करण्याची मागणी करण्यात केली.
     याप्रसंगी भारतीय जनता युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष विजयसिंह खाडे पाटील म्हणाले की, महाराष्ट्राच्या इतिहासातील सर्वात भ्रष्ट आणि निष्क्रिय सरकार म्हणून स्वतःची ओळख तयार केली, अशा महाविकास आघाडी सरकारची वक्रदृष्टी आता महाराष्ट्रातील विद्यापीठांकडे वळली आहे. विद्यापीठात राजकीय हस्तक्षेप करून आर्थिक मलिदा लाटण्याचा त्यांचा डाव आहे. जोपर्यंत हे विधेयक आघाडी सरकार मागे घेत नाही तोपर्यंत तीव्र आंदोलन करण्यात येईल.
      यावेळी प्रदेश उपाध्यक्ष सुदर्शन पाटसकर म्हणाले, राज्यातील भ्रष्टाचार आणि इतर विषय कमी पडले म्हणून की काय आता महाविकास आघाडी थेट विद्यापीठात भ्रष्टाचार करण्याच्या हेतूने विद्यापीठाच्या जमिनी घशात घालण्याचा मानस ठेऊन, थेट कुलपतींच्या अधिकारावर घाला घालण्याचे पाप या सरकारने केले आहे.
      संघटन सरचिटणीस विवेक वोरा यांनीही मनोगत व्यक्त केले. यावेळी भारतीय जनता युवा मोर्चा प्रदेश सदस्य विराज चिखलीकर, विजेन्‍द्रसिंह माने, गिरीश साळोखे, ग्रामीण जिल्ह्याचे करवीर तालुकाध्यक्ष विशाल पाटील, पन्हाळा तालुकाअध्यक्ष दिग्विजय पाटील, कोल्हापूर महानगरचे उपाध्यक्ष सुनील पाटील, वल्लभ देसाई, प्रदीप घाटगे, मयूर कदम, गौरव सातपुते, विद्यार्थी संयोजक विवेक राजवर्धन, निरंजन घाटगे, हर्षांक हरळीकर, सतीश पोवार, सुनील कुलकर्णी, प्रसाद पाटोळे, गुरुप्रसाद नागावकर, प्रतिक जांगळे आदी उपस्थित होते.
——————————————————- Attachments area

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!