कोल्हापूर • प्रतिनिधी
सकल मराठा समाजाच्या विविध प्रलंबित मागण्यांसाठी खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी नुकतेच मुंबईतील आझाद मैदानावर आमरण उपोषणास केले. त्यांच्या उपोषणाची दखल घेऊन शासनाने मराठा समाजाच्या मागण्या मान्य केल्या आहेत.
सकल मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या राज्य शासनाकडून मान्य करून घेतल्याबद्दल खासदार संभाजीराजे छत्रपती यांचा गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील व संचालक मंडळाच्यावतीने सत्कार करण्यात आला. यावेळी खासदार संभाजीराजेंनी संचालक मंडळाबरोबर मराठा समाजाच्या विविध प्रलंबित असलेल्या विषयावर चर्चा केली.
याप्रसंगी गोकुळचे चेअरमन विश्वास पाटील, जेष्ठ संचालक अरूण डोंगळे, संचालक शशिकांत पाटील-चुयेकर, किसन चौगले, नंदकुमार ढेंगे, कर्णसिंह गायकवाड, बाबासाहेब चौगले, संभाजी पाटील, प्रकाश पाटील, बयाजी शेळके, बाळासो खाडे, चेतन नरके, संचालिका श्रीमती अंजना रेडेकर, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अमर पाटील उपस्थित होते.
——————————————————