डॉ.महादेव नरके यांचा मुख्यमंत्र्यांच्या हस्ते सन्मान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     डॉ.डी. वाय. पाटील पॉलिटेक्निकचे प्राचार्य आणि वडणगे गावचे सुपुत्र डॉ. महादेव मारुती  नरके यांनी कोरोना काळात केलेल्या कामगिरीची दखल घेऊन मुंबई येथे त्यांचा दोन वेगवेगळ्या कार्यक्रमात सन्मान करण्यात आला.
    आयएसटीई नवी दिल्ली या संस्थेच्या  राष्ट्रीय पारितोषिक वितरण कार्यक्रमात  मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी राज्याचे उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, गृह राज्यमंत्री सतेज पाटील, आयएसटीईचे अध्यक्ष डॉ.प्रतापसिंह  देसाई, प्रा.विजय वैद्य, डॉ.रणजित सावंत  उपस्थित होते.
     तर  डिजिटल मीडिया संपादक पत्रकार  संघटना कार्यक्रमात राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते डॉ.नरके यांना महाराष्ट्र राज्य कोरोना योद्धा पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघटनेचे संस्थापक अध्यक्ष राजा माने उपस्थित होते.
     एकाच दिवशी राज्य आणि राष्ट्रीय पातळीवर काम करणाऱ्या दोन वेगवेगळ्या संस्थातर्फे डॉ. नरके यांचा कोविड योद्धा म्हणून गौरव करण्यात आला. याबद्दल  माजी राज्यपाल डॉ.डी.वाय.पाटील यांनी डॉ.नरके यांचे कौतुक करून आशीर्वाद दिला. संस्थेचे अध्यक्ष डॉ .संजय डी.पाटील, उपाध्यक्ष पालकमंत्री सतेज पाटील, विश्वस्त आमदार ऋतुराज पाटील, विश्वस्त पृथ्वीराज पाटील  यांनी त्यांचे विशेष अभिनंदन केले. यावेळी सौ.मधुरा नरके, आदिती नरके उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!