डॉ.अमरसिंह जाधव यांचा समाजोपयोगी संशोधन सहभागाबद्दल सन्मान

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
      येथील डी. वाय. पाटील अभियांत्रिकी महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. अमरसिंह जाधव यांना भारतामधील  सुप्रसिद्ध ESN पब्लिकेशनतर्फे त्यांच्या समाजोपयोगी प्रकल्पामधील सहभाग तसेच ग्रीन कॅटल्यसिसमधील शोध निबंध व संशोधनासाठी उद्योग विश्वाशी प्रस्थापित केलेल्या कनेक्टबद्दल ग्लोबल अवॉर्ड देऊन सन्मानित करण्यात आले.
      आंतरराष्ट्रीय परिषदेच्यावेळी हॉटेल ताज विवांता पणजी, गोवा येथे सुप्रसिद्ध संशोधक  डॉ. एच जी.बिरादार, डॉ.रजनीश वर्मा, डॉ. रेखा जगन्नाथ, डॉ. मनीष जिंदाल यांच्या उपस्थितीमध्ये समारंभ पार पडला. यावेळी पब्लिकेशनचे डॉ.परविन सोमानी, डॉ. भानुचंद्रन उपस्थित होते.
      डॉ.अमरसिंह जाधव यांनी रंकाळा खणीवर केलेल्या सुप्रसिद्ध रंकाळा जलशुद्धीकरण प्रकल्पाचे समन्वयक म्हणून काम पाहिले होते. हा प्रकल्प सुप्रसिद्ध आयसीटी, मुंबई व आरती ग्रुप, मुंबई, के. एम. सी. यांच्या योगदानातून रंकाळ्यात खणीवर राबविण्यात आला होता. याकरिता डॉ. जाधव यांना संस्थेचे अध्यक्ष डॉ.संजय डी. पाटील, विश्वस्त आ. ऋतुराज पाटील, पद्मश्री डॉ. जी. डी. यादव, कार्यकारी संचालक डॉ. अनिल कुमार गुप्ता, प्राचार्य डॉ. संतोष चेडे यांचे मोलाचे सहकार्य व प्रोत्साहन लाभले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!