आपत्कालीन परिस्थितीत उत्कृष्ट काम केलेल्या अधिकारी व कर्मचाऱ्यांचा सत्कार


कोल्हापूर • प्रतिनिधी
     शहरामध्ये उद्भवलेल्या महापूराच्या कालावधीमध्ये आपत्कालीन परिस्थितीत उत्कृष्ट काम करणाऱ्या महानगरपालिकेकडील अधिकारी व  कर्मचाऱ्यांचा प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला. स्वातंत्र्य दिनाचे औचित्य साधून हा कार्यक्रम महानगरपालिकेच्या कर्मवीर विठ्ठल रामजी शिंदे चौकात ध्वजारोहणानंतर घेण्यात आला.
     प्रशासक डॉ. बलकवडे म्हणाल्या की, शहरामध्ये उद्भवलेल्या महापूराच्या कालावधीत महापालिकेच्या अधिकाऱ्यांपासून कर्मचाऱ्यांपर्यंत सर्वांनी रात्रंदिवस जागून आपले योगदान दिलेले आहे. या काळात ज्यांनी ज्यांनी आपले योगदान दिले आहे त्यांचे मी मनापासून अभिनंदन करत आहे. महापूराच्यावेळी काही अधिकारी व कर्मचारी यांच्या स्वत:च्या घरामध्ये पाणी आले होते. परंतु आत्पकालीन परिस्थीत ते कर्तव्य बजावण्यासाठी घरी न थांबता फिल्डवर नागरिकांसाठी काम करत होते. याचबरोबर वैद्यकिय विभाग व आरोग्य स्वच्छता विभाग वैद्यकिय सुविधा व स्वच्छतेचे काम चांगले केलेले आहे. त्यामुळे आपण आत्कालीन परिस्थितीत चांगले काम केलेले आहे. महापालिका एक परिवार आहे. प्रत्येक अधिकारी व कर्मचारी या परिवाराचा सदस्य आहे.
     यावेळी अग्निशन विभागाकडील मुख्य अग्निशमन अधिकारी रणजित चिले, स्थानक अधिकारी मनिष रणभिसे, वाहन चालक संजय पाटील, फायरमन अभय कोळी, पाणी पुरवठा विभागाकडील जल अभियंता अजय साळुंखे, उपजल अभियंता जयेश जाधव, अरुण गुजर, कनिष्ठ अभियंता मिलिंद पाटील, प्रिया पाटील, पंप चालक सतिश इंगळ, मजुर अरविंद यादव, उपशहर अभियंता हर्षजीत घाटगे, कनिष्ठ अभियंता सुरेश पाटील, सर्व्हेअर तानाजी गेंजगे, मुकादन उमेश माने, कामगार सुर्यकांत यादव, विद्युत विभागाकडील कनिष्ठ अभियंता अमित दळवी, प्रणव आवटे, इलेक्ट्रिक सुपरवायझर सदानंद धनवडे, आरोग्य विभागाकडील आरोग्य ‍निरिक्षक राहुल राजगोळकर, सुशांत कांबळे, महेश भोसले, नंदकुमार पाटील, करण लाटवडे, मुनीर फरास, मनोज लोट, वैद्यकिय अधिकारी डॉ.विद्या काळे, डॉ.विश्वनाथ खैरमोडे, स्टाफ नर्स संगिता गावडे, आशा वर्कर आस्मिता केर्लेकर यांचा प्रशस्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला.
           स्वातंत्र्य लढ्यातील फोटो प्रदर्शन…..
     त्याप्रमाणे स्वातंत्र्य लढाचा रोमहर्षक इतिहास भावी पिढीला अवगत व्हावा यासाठी या इतिहासाची साधने कागदपत्रे, अवशेष, हस्ताक्षर, फोटो यांच्या संग्रहाचे प्रदर्शन महापौर कार्यालयाच्या बाहेरील गॅलरीत आयोजित करण्यात आले. हे प्रदर्शन इतिहास संशोधक बाबा महाराज यांचे चिरंजीव राजेश महाराज यांनी आयोजित केले होते.
——————————————————- Attachments area

ReplyForward

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *