राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये पहिली सेमी इंग्रजीच्या वर्गात ३० विद्यार्थ्यांचे प्रवेश

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
   कोल्हापूर महानगरपालिका प्राथमिक शिक्षण समिती संचलित राजर्षी शाहू विद्यामंदिरमध्ये इयत्ता पहिली सेमी इंग्रजीच्या वर्गामध्ये ३० विद्यार्थ्यांचे प्रवेश झाले.
    कसबा बावड्यातील सामाजिक कार्यकर्ते संजय लाड यांच्या हस्ते व लक्ष्मण लाखे, रविंद्र लाखे, प्रकाश चौगुले, सतीश पाटील, सुनिल जाधव,  बाबुराव सुतार, नारायण घेवदे यांच्या उपस्थितीत विद्यार्थ्‍यांना मास्क, राजा पाट इत्यादी शैक्षणिक साहित्य वाटप करण्यात आले. कार्यक्रमासाठी भारतवीर मित्र मंडळाचे पदाधिकारी व  कसबा बावडा रिक्षा मित्र मंडळ यांनी मास्क दिले.
     शाळेचे  केंद्र मुख्याध्यापक डॉ. अजितकुमार पाटील यांनी शासनाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करा व त्यांचा वापर करून आपल्या विद्यार्थ्याला शिक्षण द्यावे असे आवाहन केले. विद्यार्थी व पालकांचे स्वागत बालवाडीच्या मुख्याध्यापिका कल्पना पाटील यांनी केले. कार्यक्रमास सुशील जाधव, शिवशंभू गाटे, उत्तम कुंभार, हेमंत कुमार पाटोळे सुजाता आवटे, आसमा तांबोळी, तमाशा मुजावर तसेच शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य उपस्थित होते. आभार सुजाता आवटी यांनी मानले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!