कोल्हापूर • प्रतिनिधी
जागतिक पर्यावरण दिनानिमित्त महापालिकेच्यावतीने महावीर उद्यान येथे प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे व कोरोनामुक्त झालेल्या प्रसाद बिडंगे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.
यावेळी प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांनी वातावरणामध्ये नैसर्गिक ऑक्सिजनचे प्रमाण वाढविण्यासाठी किमान एका झाडाचे वृक्षारोपण करून त्याचे संगोपन करावे असे आवाहन केले आहे. तसेच शहरामध्ये मोठ्या प्रमाणात वृक्षारोपण व संवर्धन करण्यासाठी शहरवासियांनी प्रयत्न करावेत असे आवाहन केले आहे.
यावेळी शहर अभियंता नेत्रदीप सरनोबत, पर्यावरण अधिकारी तथा प्र.उद्यान अधीक्षक समीर व्याघ्रांबरे, नगरसचिव सुनील बिद्रे व सहा उद्यान अधीक्षक राम चव्हाण व कर्मचारी उपस्थित होते.
तसेच महापालिका व स्वरा फौंडेशनच्यावतीने जयंती पंपिंग स्टेशन येथे अतिरिक्त आयुक्त नितिन देसाई, लक्ष्मीपुरी स्टेशनचे पोलिस निरीक्षक अनिल गुजर, वाहतूक पोलीस निरीक्षक नेहा गिरी यांच्या हस्ते वड, पिंपळ, जारूळ, बदाम, कदंब, करंज, गुलमोहर, बकुळ ही झाडे लावण्यात आ