पन्हाळा नगरपरिषदेच्या “पर्यावरण स्नेही बाप्पा” उपक्रमास उदंड प्रतिसाद

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     पन्हाळा नगरपरिषदमार्फत “पर्यावरण स्नेही बाप्पा” या उपक्रमाअंतर्गत घरगुती गणेशमूर्ती  विसर्जन करण्याकरिता कृत्रिम कुंड तयार करण्यात येऊन तो शहरातील प्रत्येक गल्लीमधून फिरवण्यात येत आहे. या उपक्रमास शहरातील नागरिकांकडून उदंड प्रतिसाद मिळत आहे.
     याप्रसंगी शहरातील गणेश मंडळांकरिता नगरपरिषदमार्फत “पर्यावरणपूरक गणेशोत्सव स्पर्धा” आयोजित करण्यात आली होती. याअंतर्गत बाप्पांची शाडूची मूर्ती, पर्यावरणपूरक सजावट, प्लास्टिक व थर्मोकॉलचा शून्य वापर, कोव्हीड अंतर्गत उपाययोजना अशा विविध निकषांच्या आधारे स्पर्धा घेण्यात आली. यामध्ये श्री बालाजी क्रीडा मंडळ यांचा प्रथम क्रमांक, मृत्युंजय ग्रुप यांचा द्वितीय क्रमांक तर श्री दत्त तरुण मंडळ यांचा तिसरा क्रमांक आला.
     शहरातील नागरिक व तरुण मंडळांनी या अभिनव उपक्रमास उदंड प्रतिसाद दिल्याबद्दल मुख्याधिकारी स्वरूप खारगे यांनी आभार मानले. यावेळी नगराध्यक्षा सौ. रुपाली रविंद धडेल, नगरसेवक दिनकर भोपळे, फिरोज मुजावर तसेच माजी उपनगराध्यक्ष रवींद्र धडेल, मंदार नायकवडी, राहुल भोसले व इतर मान्यवर उपस्थित होते. हा उपक्रम यशस्वी करण्यास नगरपरिषदचे अमित माने, अंशुमन गायकवाड, नंदकुमार कांबळे व इतर कर्मचारी यांचे सहकार्य लाभले.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!