कोल्हापूर • प्रतिनिधी
दिवा पिजंट्सच्यातर्फे मिसेस महाराष्ट्र २०२१ सिझन ५ चे आयोजन पुणे येथे पंचतारांकीत हॉटेल हयातमध्ये करण्यात आले होते. महाराष्ट्रातून फक्त ५० विवाहीत सौदर्यवतीची अंतिम फेरीसाठी निवड करण्यात आली. त्यामध्ये सौ. दर्शना सुनील जाधव यांना सिनेअभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्या हस्ते महाराष्ट्र टाईमलेस ब्युटी या पुरस्काराने सन्मानीत करण्यात आले.
या स्पर्धेसाठी परिक्षक अभिनेत्री कश्मीरा शाह, अभिनेता शक्ती कपूर हे उपस्थित होते. सौ. दर्शना जाधव या पंधरा वर्षापासून वारणा सारख्या छोट्या गावात राहून हा मोठा किताब मिळवला. त्याबद्दल सर्व कोल्हापूर जिल्ह्यातुन कौतुकाचा वर्षाव होत आहे.