निगवे दुमालाच्या विकासासाठी नेहमीच पुढाकार घेऊ: खा. संजय मंडलिक

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     निगवे दुमालाच्या सर्वांगीण विकासासाठी नेहमीच पुढाकार घेऊ, असे प्रतिपादन खासदार संजय मंडलिक यांनी केले.
     निगवे दुमाला (ता. करवीर) येथे विकासकामाच्या उद्घाटनप्रसंगी हे बोलत होते. अध्यक्षस्थानी सरपंच सुवर्णा एकशिंगे होत्या. माजी जिल्हा परिषद सदस्य बाजीराव पाटील हे प्रमुख उपस्थित होते.
   खासदार संजय मंडलिक  यांच्या प्रयत्नातून जिल्हा नियोजनमधून पूरहानी व अतिवृष्टी या योजनेतून रामा मार्ग क्रमांक १९४ ला मिळणारा रस्ता व हरिजन वस्तीलगत संरक्षण भिंत व रस्त्यासाठी ३७ लाख रुपये तसेच  गटारीसाठी १० लाख रुपये असा एकूण ४७ लाखांचा निधी मंजूर झाल्याचे माजी सरपंच सुरेश पाटील यांनी सांगितले.
      जय हिंद विकास संस्थेचे माजी चेअरमन डॉ.एम.बी.किडगावकर यांनी स्वागत केले. तर अर्जुन पाटील यांनी आभार मानले.
      यावेळी उपसरपंच धनाजी पाटील, प्रकाश पाटील, सतीश कुरणे, बत्तासो चौगले, रणजीत पाटील, राजाराम कासार, कृष्णात जासूद, सर्जेराव पाटील, एकनाथ दळवी यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!