आयजीएम हॉस्पिटलला नाम.मुश्रीफ फाउंडेशनकडून २५ ऑक्‍सिजन कॉन्सन्ट्रेटर

       
कोल्हापूर • प्रतिनिधी
       नामदार हसन मुश्रीफ फाउंडेशनच्यावतीने इचलकरंजीतील इंदिरा गांधी मेमोरियल – आयजीएम हॉस्पिटलला २५ ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर प्रदान करण्यात आले. फाउंडेशनचे अध्यक्ष व गोकुळचे नूतन संचालक नवीद मुश्रीफ यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम झाला.
      यावेळी नवीद मुश्रीफ म्हणाले की, कोरोना महामारीत ऑक्सिजनची टंचाई लक्षात घेता, पर्याय म्हणून फाउंडेशनच्यावतीने ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर मशीनचे वाटप जिल्हाभर केले. सीपीआरसह आयजीएम, जिल्ह्यातील कोरोना हॉस्पिटल व कोरोना केअर सेंटरला ही मशीन्स प्रदान करण्यात आली आहेत. आठवड्यापूर्वीच ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, पालकमंत्री सतेज पाटील आणि आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील- यड्रावकर यांनी आयजीएमला भेट देऊन आढावा घेतला होता. त्यावेळी मंत्री श्री. मुश्रीफ यांनी आयजीएम हे लवकरच सर्व सुविधांनीयुक्त या भागाच्या वैद्यकीय सुविधेचे अत्याधुनिक केंद्र बनेल, अशी ग्वाही दिली होती. त्यांचे वचनही लवकरच पूर्ण होईल.
      यावेळी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रांतिकचे सदस्य मदनराव कारंडे, माजी आमदार राजू किसनराव आवळे, केडीसीसी बँकेचे संचालक विलासराव गाताडे, इचलकरंजी शहर राष्ट्रवादीचे अध्यक्ष व नगरसेवक प्रकाश पाटील, वैद्यकीय अधीक्षक डॉ. रविकुमार शेटे, नगरसेवक संजय बेडक्याळे, अमित गाताडे, इचलकरंजी शहर राष्ट्रवादी अल्पसंख्याक सेलचे अध्यक्ष सलीम ढालाईत, सुभाष मालपाणी, राष्ट्रवादीचे युवक अध्यक्ष अभिजित रौदे, संतोष पाटील, संभाजी सूर्यवंशी, मच्छिंद्र नगारे, युवराज जाधव, किरण शेरखाने आदी प्रमुख उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *