सिटीझन फोरम आयोजित “रन फॉर पीस” उत्साहात

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     सिटीजन फोरम तर्फे Ymca आयोजित “रन फॉर पिस”चे शनिवारी सकाळी आयोजन करण्यात आले होते. वायल्डर मेमोरियल चर्च – रेल्वे स्टेशन मारुती मंदिर – शाहूपुरी बडी मशीद – स्टेशन रोड मार्गे झालेल्या दौडमध्ये अठरापगड जातीचे लोक सहभागी झाले होते. यावेळी विविध जाती धर्मांच्या चर्च, मंदिर, मस्जिद येथे विश्वशान्तीची प्रार्थना करण्यात आली.
     यावेळी देशबांधवांना समतेचा संदेश देऊन निरोगी भारत, राष्ट्रीय आरोग्य व राष्ट्रीय एकात्मता जपण्याचे सर्व भारतीयांना आवाहन  केले. त्याचबरोबर कोरोनासारख्या महाभयंकर आजाराच्या संकटाचे सावट संपूर्ण जगासह आपल्या देशावरही आहे याचं भान राखण्याचे आवाहन करण्यात आले. मास्क व सॅनिटायझर, सोशल डिस्टंसिंग पाळून सर्व देशबांधवांचे व आपले आणि आपल्या कुटुंबाचे आरोग्य निरोगी राखूया, सामजिक एकता जपुया अशी प्रतिज्ञा करण्यात आली. यावेळी भारतमाता की जय, हम सब एक है अशा घोषणा देण्यात आल्या.
      याप्रसंगी प्रसाद जाधव, अतुल रुकडीकर, अभय वेंगुर्लेकर, वैभव राजे भोसले, आनंद म्हाळुंगेकर, डॅनियल धनवडे, विवेक रणनवरे, संभाजीराव जगदाळे, राहुल फल्ले, बार असोसिएशनचे सेक्रेटरी ॲड. विजय ताटे, ॲड. बी. एम. पाटील, ॲड. रवींद्र, ॲड. प्रमोद दाभाडे, अशोक रामचंदाणी, किशोर घाटगे, राजेंद्र चव्हाण, डॉ. मिलिंद वानखेडे, प्रसन्न शिंदे, राजवर्धन यादव, छत्रपती शिवाजी मुस्लिम ब्रिगेडच्या आयेशा फिरोज खान, समीर शेख, राजेंद्र थोरवडे, नंदू यादव, संग्राम कौलवकर पाटील, धनंजय शिंदे, प्रतीक काळे, मार्क धनवडे, मिलिंद पारकर, विशाल शिराळकर, सुनील पाटील यांच्यासह नागरिक सहभागी झाले होते.
——————————————————-

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!