स्टार लोकलमार्टच्या ५०व्या स्टोअरचे उद्घाटन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     स्टार लोकल मार्ट, ही संजय घोडावत ग्रुप (SGG) ची रिटेल बँच आहे. कंपनीसाठी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड म्हणून ओळखल्या जाणाऱ्या आपल्या ५० व्या स्टोअरच्या उद्घाटनाचा सोहळा सोमवारी पार पडला. विवेकानंद कॉलेज समोरच्या ५० व्या स्टोअरचे उद्घाटन संजय घोडावत यांच्या हस्ते झाले. यावेळी श्रेणीक घोडावत व विनायक भोसले आदी मान्यवर उपस्थित होते.
      याप्रसंगी संजय घोडावत म्हणाले की, आमची प्रगती ही संपूर्ण स्टार लोकलमार्ट कुटुंबाच्या प्रयत्नांचा आणि अखंडतेचा पुरावा आहे. ग्राहकांचा असा प्रतिसाद आणि स्वीकृती पाहून मला अभिमान आणि आनंद वाटतो. स्टार लोकलमार्टने ग्राहकांच्या जीवनात काळजीपूर्वक बदल घडवून आणला आहे. प्रत्येकवेळी स्टार लोकलमार्ट या ध्येयाशी खरा राहिला आहे. दिवसेंदिवस देशभरातील ग्राहकांचा रिटेलमध्ये खरेदी करण्याचा अनुभव चांगला व्हावा यासाठी आम्ही वचनबद्ध आहोत.
      ते पुढे म्हणाले की, २१ व्या शतकातील रिटेल फ्रँचायझी मॉडेलच्या अभिनव कल्पनेनुसार स्थानिक उद्योगांचे सक्षमीकरण होईल. उत्कृष्ट सवलती, दर्जेदार उत्पादने आणि अतुलनीय अनुभवाची खात्री तसेच उत्कृष्ट ग्राहक सेवा देणे हे स्टार लोकलमार्टचे उद्दिष्ट आहे. स्थानिक रोजगार, स्थानिक कंपन्यांना त्यांची उत्पादने प्रदर्शित करण्यासाठी जागा आणि स्थानिक उद्योजकतेला चालना देणारी जागा यामुळे आमची संकल्पना वेगळी ठरते. स्टार लोकलमार्टचे ५० व्या स्टोअरची सुरूवात ही आमच्या सर्वांसाठी अभिमानाची गोष्ट आहे . मागील वर्षाने आम्हाला हा अविश्वसनीय उपक्रम पूर्ण करण्यासाठी प्रवृत्त केले आहे , जे आमच्या ग्राहकांना एक उत्कृष्ट खरेदीचा अनुभव देण्याचे वचन देते. स्वच्छतेचे , सुलभतेचे आणि सोयीचे आश्वासन ग्राहक शोधतात ही वस्तुस्थिती समजून घेऊन आम्ही देशभरातील शहरे आणि खेड्यांमध्ये आमचा ठसा विस्तारत राहण्याची आशा करतो.
      स्टार लोकलमार्ट सध्या ५० रिटेल स्टोअर्स चालवते. महाराष्ट्र आणि कर्नाटकातील कोल्हापूर, पुणे, सांगली, इचलकरंजी, रत्नागिरी, मिरज, बेळगांव, बागलकोट आणि इतर ठिकाणी २५,००० रोजगाराच्या संधी निर्माण करण्यासोबतच, २०२५ पर्यंत ३००० स्टोअर्स सुरू करण्याचे उद्दिष्ट आहे. स्टार लोकलमार्ट हे किराणा सामान आणि इतर घरगुती गरजा यांच्या उच्च दर्जाच्या आणि कमी किंमतीच्या दैनंदिन खरेदीसाठी वनस्टॉप शॉपिंग डेस्टिनेशन आहे. 

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!