छत्रपती शाहूंची दुर्मिळ छायाचित्रे व पारित केलेले आदेश यांच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

Spread the love


कोल्हापूर • (जिमाका)
     राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांच्या स्मृती शताब्दी कृतज्ञता पर्वानिमित्त जिल्हा प्रशासनाने वेगवेगळे उपक्रम राबविण्यास सुरुवात केली आहे. त्याचाच एक भाग म्हणून २३ एप्रिल रोजी शाहू मिल येथे छत्रपती शाहू महाराजांची दुर्मिळ छायचित्रे, त्यांनी वेळोवेळी काढलेले लोकोपयोगी आदेश आणि कायदा कागदपत्रे आदींच्या प्रदर्शनाचे उदघाटन जेष्ठ नेते खा.शरद पवार यांच्या हस्ते तर श्रीमंत शाहू छत्रपती महाराज व पालकमंत्री सतेज पाटील यांच्या प्रमुख उपस्थित संपन्न झाले.
      शाहू मिलच्या परिसरात भरलेल्या या आगळ्या – वेगळ्या प्रदर्शनात शाहू महाराजांच्या इ. स.१८९४ – ते १९२२ या २८ वर्षांच्या दैदिप्यमान राज्य कारभाराचा कालखंड या प्रदर्शनातून शाहूप्रेमींसाठी पाहायला मिळणार आहे. या प्रदर्शनाचे खा. पवार यांनी मनःपूर्वक कौतुक करुन या प्रदर्शनाला शुभेच्छा दिल्या.
       यावेळी कोल्हापूर मनपाच्यावतीने शाहू मिल येथे प्रस्तावित शाहू स्मारकाचे दृष्य प्रणालीद्वारे सादरीकरण करण्यात आले. वस्त्रोद्योग महामंडळाकडून सदरची जागा हस्तांतरीत झाल्यानंतर ही जागा मनपा विकसित करणार आहे.
       ज्याप्रमाणे संशोधन ग्रंथ, दर्जेदार लेख कादंबऱ्यामुळे एखाद्या ऐतिहासिक चारित्र्यावर प्रकाश पडतो, तद्वत छायाचित्रांच्या माध्यमातून एखादे व्यक्तिमत्व अत्यंत प्रभावीपणे समोर येणार असून स्मृती शताब्दी पर्वानिमित्त आयोजित केलेले हे चित्रमय प्रदर्शन जनतेसाठी आदरयुक्त व आकर्षणाचा विषय ठरणार आहे. या प्रदर्शनात सुमारे २०० हून अधिक दुर्मिळ छायाचित्रांचा समावेश आहे.
       या प्रदर्शनामध्ये शाहूंच्या राजकीय, सामाजिक जीवनातील विविध प्रसंगांची छायाचित्रे, शाहूंचे राज्यरोहण, कौटुंबिक, परदेश दौरा, शिकारीची तसेच शाहूकालीन इतर छायाचित्रे, यासह २८ वर्षाच्या कालखंडात शाहूंनी वेळोवेळी जनहितार्थ केलेल्या सुमारे १ लाख आदेशातील निवडक आदेश, कायदे, कागदपत्रे व इतर पत्र व्यवहार शाहू व इतिहास प्रेमींना पहावयास मिळेल .
      याप्रसंगी खासदार श्रीनिवास पाटील, आ.अरुण लाड, आ.जयंत आसगावकर, माजी आमदार प्रकाश गजभिये, जिल्हा अधिकारी राहूल रेखावार, पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे, आयुक्त कादंबरी बलकवडे, इतिहास संशोधक इंद्रजीत सावंत, वसंत मुळीक, अमरजा निंबाळकर, प्रवीण गायकवाड, अभिनेत्री अमृता खानविलकर, अभिनेता आदित्य कोठारे यांची प्रमुख उपस्थिती होती.  

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!