आंतरराष्ट्रीय किर्तीच्या मराठी संशोधकांच्या कार्याची माहिती देणाऱ्या प्रदर्शनाचे उद्घाटन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी 
      निसर्ग मित्र संस्थेतर्फे “स्वातंत्र्याचा अमृतमहोत्सव” व राष्ट्रीय विज्ञान मासानिमित्त संस्थेचे सदस्य पराग केमकर यांच्या संकल्पनेतून महाराष्ट्रातील शास्त्रज्ञांच्या जीवनकार्यावर आधारित  माहिती प्रदर्शनाचे येथील आदर्श प्रशालेमध्ये  ‘तीवर’ वृक्षाला पाणी घालून उदघाटन करण्यात आले. यावेळी जेष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर, दिलीप पेटकर, मुख्याध्यापक आर. वाय. पाटील, अनिल चौगुले, पराग केमकर व बाल वैज्ञानिक सुमेद जिल्हेदार उपस्थित होते.
      यावेळी अंध व्यक्तींसाठी आधुनिक काळात उपयुक्त ठरणारी ब्लाइंड मॅन स्मार्ट स्टिक तयार केल्याबद्दल बालवैज्ञानिक सुमेध सच्चिदानंद जिल्हेदार याला मान्यवरांच्या हस्ते गौरविण्यात आले.
      सदरचे प्रदर्शन १२ तालुक्यातील विविध शाळांमध्ये २८ फेब्रुवारीपर्यंत वेगवेगळ्या दिवशी प्रदर्शित होणार आहे.
      याप्रसंगी ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते सुरेश शिपूरकर यांनी मनोगत व्यक्त केले. प्लास्टिकचा शोध मानवानेच लावला, पण त्याचा अतिरेक झाला. त्यामुळे प्लास्टिकचा राक्षस आपल्याला नष्ट करायचा असल्यास दैनंदिन जीवनात कागदी व कापडी पिशवी स्वतः तयार करून त्या वापरण्याचे आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केले. प्रदर्शनातील मराठी संशोधकांनी केलेल्या संशोधनाचा अभ्यास विद्यार्थ्यांनी करून त्याची माहिती घेऊन आपणही समाजोपयोगी नवेनवे संशोधन करावे असे मार्गदर्शन केले.
      दिलीप पेटकर यांनीही आपले मनोगत व्यक्त केले. स्वागत व प्रस्थाविक आर. वाय. पाटील यांनी केले तर आभार राहुल माने यांनी मानले.
      यावेळी घरगुती कचरा व्यवस्थापन, वनस्पतीजन्य रंग निर्मिती, चला सायबर मित्र बनूया, घर तिथे परसबाग शहर तिथे शहरी शेती फुलवूया, सौरऊर्जेचा दैनंदिन जीवनातील वापर, आपत्ती व्यवस्थापन ( वनवा व पूर) या विषयांवर संस्थेचे कार्यवाह अनिल चौगुले व सदस्य पराग केमकर यांच्या मार्गदर्शनाखाली विद्यार्थ्यांची विज्ञानाधारीत कार्यशाळा पार पडली. यावेळी परिसरातील काडीकचरा, पालापाचोळा, नारळाची शेंडी व करवंटी शास्त्रीयदृष्ट्या ज्वलन होण्याच्यादृष्टीने रॉकेट स्टोव्हचे प्रात्यक्षिक दाखवण्यात आले.
     या प्रदर्शनाचे संयोजन अमोल सरनाईक, ओंकार मोरे, शामराव कांबळे, अस्मिता चौगुले, शाळेचे शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!