दिवाळी फराळासह शोभेच्या वस्तूंच्या प्रदर्शनाचे उद्घाटन

Spread the love

• बचतगटांना प्रशासक डॉ.बलकवडे यांची सहकार्याची ग्वाही
कोल्हापूर • प्रतिनिधी
      कोरोनामुळे महिला बचत गटांच्या बंद पडलेल्या व्यवसायाला उभारी देण्याबरोबरच बेघर लाभार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून सर्वतोपरी सहकार्य करेल, अशी ग्वाही प्रशासक डॉ. कादंबरी बलकवडे यांनी दिली. जगदाळे हॉल येथील महिला बचत गट आणि बेघर निवाऱ्यातील लाभार्थ्यांनी उत्पादित केलेल्या वस्तुंच्या विक्री प्रदर्शनाच्या उदघाटनाप्रसंगी त्या बोलत होत्या.
     महानगरपालिका राष्ट्रीय उपजीविका अभियानाअंतर्गत महिला बचत गट तसेच बेघर निवारा लाभार्थी व्यक्तीच्या उत्पादित वस्तुंना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी महानगरपालिकेतर्फे एक हात सहकार्याचा या संकल्पनेतुन २८ ऑक्टोबर ते २ नोव्हेंबर या कालावधीत उत्पादित वस्तूंच्या विक्री आणि प्रदर्शनाचे आयोजन राजारामपुरीतील जगदाळे हॉल येथे करण्यात आले आहे. या प्रदर्शनाचे उदघाटन प्रशासक डॉ कादंबरी बलकवडे यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी उपायुक्त शिल्पा दरेकर, महिला आर्थीक विकास महामंडळाचे सचिन कांबळे, रोहित सोनुले, निवास कोळी, विजय तळेकर, स्वाती शाह, अंजनी सौदलगेकर आदी उपस्थिती होते.
      प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी उपस्थित महिला बचत गटाच्या महिलांनी आणि बेघर निवाऱ्यातील लाभार्थ्यांनी तयार केलेल्या कलाकुसरीच्या वस्तूंबाबत त्यांचे कौतुक केले. यापुढेही त्यांना हक्काचे व्यासपीठ मिळावे यासाठी महपालिकेचे सर्वतोपरी सहाकार्य राहील अशी ग्वाही दिली. तर कोरोना काळात महिला बचत गटांच्या बंद पडलेल्या व्यवसायाला उभारी देण्याबरोबरच बेघर लाभार्थ्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी सर्व नागरिकांनी या प्रदर्शनाला भेट द्यावी असे आवाहन प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे यांनी केले.
      या प्रदर्शनात मातीच्या शोभेच्या वस्तू, खणापासून बनवलेले आकाशदिवे, लहान आकाशदिवे, बांबूपासून बनवलेले आकाशदिवे, फराळ, पणत्या, मुर्त्या, रांगोळी, शुभेच्छा बॉक्स, पापडाचे विविध प्रकार, कापडी, कागदी पिशव्या, आयुर्वेदिक साबण, उटणे, झाडू, हळद, चटणी, बांगड्या इत्यादी वस्तू उपलब्ध आहेत. हे प्रदर्शन सकाळी दहा ते रात्री आठ वाजेपर्यंत सुरू आहे.

Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!