कोल्हापूर • प्रतिनिधी
गोकुळच्या आपटेनगर परिसरातील नव्या शॉपीचे व मे.रामचंद्र तवनाप्पा मुग यांच्या ८ व्या शाखेचा संयुक्त उद्घाटन सोहळा गोकुळ दूध संघाचे चेअरमन विश्वास पाटील यांच्या हस्ते व जेष्ठ संचालक अरूण डोंगळे तसेच रामचंद्र मुग बझारचे महावीर रामचंद्र मुग व गोकुळचे कार्यकारी संचालक डी. व्ही. घाणेकर यांच्या उपस्थित संपन्न झाला. यावेळी सौ. दिपाली राहुल मुग, गोकुळचे मार्केटिंग विभागाचे व्यव्स्थापक हणमंत पाटील, लक्ष्मण धनवडे, प्रतिक मुळीक, शॉपीचे प्रोप्रा. सौ.स्वेता पाटील, जयवंत पाटील आदी उपस्थित होते.
गोकुळची विविध दर्जेदार उत्पादने उपलब्ध व्हावीत आणि उत्पादनाचा परिसरातील नागरिकांना आस्वाद घेता यावा याकरिता नवीन शॉपी निर्माण केली आहे. या शॉपीमध्ये दूध, श्रीखंड, आंबाश्रीखंड, तूप, पनीर, बटर, दही, ताक, लस्सी, दूध पावडर, बासुंदी इत्यादी पदार्थ विक्रीसाठी उपलब्ध ठेवले जाणार आहेत.