बिनखांबी गणेश मंदिरानजीक गोकुळ शॉपीचे उद्घाटन


कोल्हापूर • प्रतिनिधी
     कोल्‍हापूर जिल्‍हा सहकारी दूध उत्‍पादक संघ (गोकुळ) च्‍या दूध व दुग्‍धपदार्थ शॉपीचे उद्घाटन संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांच्‍या हस्‍ते व जेष्‍ठ संचालक अरूण डोंगळे यांच्‍या उपस्थितीत घटस्‍थापनेच्‍या मुहूर्तावर बिनखांबी गणेश मंदिरशेजारी झाले.
  या नव्याने सुरू झालेल्या शॉपीमध्ये गोकुळ दूध,तूप,पनीर,दही,ताक,लस्सी,श्रीखंड सर्व पदार्थ उपलब्ध आहेत. महालक्ष्‍मी मंदिर व बिनखांबी गणेश मंदिर परिसरातील नगरिकांना व बाहेरील जिल्‍ह्यातील येणारे भाविका यांना गोकुळची विविध दर्जेदार दूध उत्पादने, दुग्‍धपदार्थ उपलब्ध होतील असे संघाचे चेअरमन विश्‍वास पाटील यांनी सांगितले. 
     यावेळी मार्केटिंग व्‍यवस्‍थापक हणमंत पाटील, शॉपी मालक कमलेश डोंगरे, स्वप्नील नवाळे, संघाचे अधिकारी लक्ष्‍मण धनवडे, जनसंपर्क अधिकारी सचिन पाटील, अजित आडके आदी उपस्थित होते.
——————————————————-

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *