आयसोलेशन हॉस्पीटल येथील ऑक्सिजन प्लॅन्टचा पालकमंत्र्यांच्या हस्ते शुभारंभ


कोल्हापूर • प्रतिनिधी
     महानगरपालिकेच्या द्वारकानाथ कोटणीस आयसोलेशन हॉस्पीटलसाठी ऑक्सिजन पुरवठा होण्याकरीता नव्याने उभारण्यात आलेल्या १०८० क्यु.मी. क्षमतेच्या ऑक्सिजन जनरेटर प्लॅन्टचा शुभारंभ जिल्हयाचे पालकमंत्री सतेज पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी आ.अरुण लाड, आ.चंद्रकांत जाधव, आ. ऋतूराज पाटील, प्रशासक डॉ.कादंबरी बलकवडे उपस्थित होते.
      हा प्लॅन्ट उभा करण्यासाठी जिल्हा नियोजन समितीमधून निधी प्राप्त झाला आहे. यासाठी ८०.२५ लाख खर्च करण्यात आला आहे. कोरोना पॉझीटीव्ह रुग्णांना तात्काळ ऑक्सिजनची सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी महापालिकेने अल्पावधीतच आयसोलेशन हॉस्पीटल येथे हा प्लॅन्‍ट उभा केला आहे. या ऑक्सीजन प्लॅन्टमुळे कोरोना रुग्णांच्या उपचारासाठी मदत होणार आहे.
     या ऑक्सीजन प्लॅन्टला आवश्यक तो वीजपुरवठा करण्यासाठी कोणतीही फि न आकारता तसेच ट्रान्सफॉर्मशी निकडीत काम तात्काळ करुन वीजपुरवठा महावितरणने चालू करुन दिला आहे. यासाठी महावितरणचे अधिक्षक अभियंता अंकूर कावळे, कार्यकारी अभियंता नामदेव गांधले, अतिरिक्त कार्यकारी अभियंता अजित अस्वले, सहाय्यक अभियंता राजेंद्र खोत यांचे सहकार्य लाभले आहे.
     यावेळी अतिरिक्त आयुक्त नितीन देसाई, उपआयुक्त रविकांत आडसूळ, निखिल मोरे, शहर अभियंता नेत्रदिप सरनोबत, वैद्यकिय अधिकारी रमेश जाधव, विद्युत कनिष्ठ अभियंता अमित दळवी, माजी महापौर सौ. निलोफर आजरेकर, माजी उपमहापौर संजय मोहिते, माजी नगरसेवक भूपाल शेटे, शारगंधर देशमुख, सचिन पाटील, राहुल माने, प्रकाश गवंडी, मधूकर रामाणे, सौ. वृषाली कदम, सौ. ललिता बारामते व नागरिक उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *