संगोपन हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर आणि ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटरचे आज उद्द्घाटन

Spread the love

कोल्हापूर • प्रतिनिधी
     वैद्यकीय सेवेमध्ये रुजू होत असलेल्या कै. गुंडू (हमाल) अण्णाप्पा पाटील शैक्षणिक, सामाजिक मेडिकल बहुउद्देशीय चॅरिटेबल ट्रस्ट, नरेवाडी संचलित संगोपन हॉस्पिटल ॲण्ड रिसर्च सेंटर आणि ऑन्को लाइफ कॅन्सर सेंटर सातारा यांच्या संयुक्त विद्यमाने या मल्टीस्पेशालिटी व कॅन्सर स्पेशालिटी हॉस्पिटलचा उद्घघाटन सोहळा शनिवारी (दि.२७) सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे ग्रामविकासमंत्री हसन मुश्रीफ यांच्या हस्ते व आरोग्य राज्यमंत्री राजेंद्र पाटील – यड्रावकर यांच्या उपस्थितीत आ. राजेश पाटील,आ. प्रकाश आबिटकर यांच्या अध्यक्षतेखाली होणार असल्याची माहिती ट्रस्टचे चेअरमन मच्छिंद्रनाथ पाटील यांनी पत्रकार परिषदेत दिली.
      ते म्हणाले की, ४० बेड असलेले हे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल आहे. याच्या माध्यमातून कॅन्सरसह इतर अनेक आजारांवर सुविधा उपलब्ध केल्या असून आधुनिक तंत्रज्ञानाने सुसज्ज असे विभाग हॉस्पिटलमध्ये आहेत. गडहिंग्लज तालुक्यातील नरेवाडी येथे असणारे हे हॉस्पिटल तालुक्यासह कर्नाटक-महाराष्ट्र सीमाभागांतील अनेक गरजूंसाठी उपयुक्त ठरणार आहे. भारतातील सर्वात आधुनिक रेडिएशन उपचार यंत्रणा, सुमारे तीस वर्षाचा रेडिएशन तंत्रातील जागतिक पातळीवर अनुभव असलेले पूर्णवेळ तंत्रज्ञ, निरोगी पेशी सुरक्षित ठेवून अगदी १ एम.एम. इतक्या अचूकतेने कॅन्सर पेशीवर उपचार करणे आणि टाटा मेमोरियल कॅन्सर हॉस्पिटल येथील दीर्घ अनुभव असलेले कॅन्सर स्पेशालिस्ट डॉक्टर हीच या हॉस्पिटलची महत्त्वाची वैशिष्ट्ये आहेत. 
     यामध्ये तज्ज्ञ डॉक्टर्स, नर्सेस व इतर स्टाफ असून टाटा मेमोरियल हॉस्पिटल येथे कॅन्सरमध्ये प्रशिक्षित तज्ञ झालेले डॉक्टर उपलब्ध आहेत. ग्रामीण भागात अत्याधुनिक आरोग्यदायी व सर्वसामान्यांना परवडतील अशा वैद्यकीय सेवा एकाच छताखाली उपलब्ध झाली आहे. शासकीय जनआरोग्य योजनेअंतर्गत पिवळे व केशरी रेशन कार्डधारकांना मोफत उपचार उपलब्ध असणार आहेत. तसेच गरजू रुग्णांसाठी माफक दरात पिक-अप-ड्रॉप सुविधासुद्धा उपलब्ध करून दिली आहे. जगासमोरील एक कठीण आव्हान म्हणून ज्या कर्करोगाकडे पाहिले जाते, अशा जीवघेण्या आजार असणार्‍यांना हे हॉस्पिटल वरदान ठरणार आहे, असेही मच्छिंद्रनाथ पाटील यांनी सांगितले.
      पत्रकार परिषदेस यावेळी व्हीसीद्वारे ऑन्को-लाईफचे संस्थापक-अध्य्क्ष उदय देशमुख, डायरेक्टर रिसोर्स डॉ. प्रताप राजेमहाडिक, संगोपनचे एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर डॉ.अर्जुन शिंदे, अभासेचे जिल्हाध्यक्ष सचिन पाटील, प्रसिद्धी प्रमुख़ अमरसिंह राजे, सौ.सुनंदा नाईक आदी उपस्थित होते.
——————————————————- Attachments areaReplyForward
Advertisement

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!