शितोळे हॉस्पिटलच्या वृंदावन हेल्थ आणि डायबेटिक युनिटचे शनिवारी उद्घाटन

Spread the love


कोल्हापूर • प्रतिनिधी
     येथील शितोळे हॉस्पिटलने आता आपली आणखी नवी वाटचाल सुरू केली आहे. वृंदावन हेल्थ आणि डायबेटिक युनिटची सुरुवात केली आहे. महावीर कॉलेज जवळील न्यू पॅलेस रोड येथे सुरु केलेल्या या युनिटचे उदघाटन शनिवारी (दि.१८) सायंकाळी ५ वाजता डॉ.अशोक भूपाळी व शिवाजी विद्यापीठचे कुलगुरू डॉ. डी. टी. शिर्के यांच्या हस्ते  होणार आहे. यावेळी  गोकुळ संचालक अरुण डोंगळे, आराम गादी कारखानाचे अविनाश वाडीकर, लकी फर्निचरचे राजेंद्र बडे,, माजी डीवायएसपी सुरेश पवार, साई बिल्डर्सचे प्रकाश मेडशिंगे व मदन घाडगे आदींची प्रमुख उपस्थिती असल्याची माहिती डॉ. महेश्वर शितोळे व डॉ. आशा शितोळे, डॉ. डी. जी. शितोळे यांनी पत्रकार परिषदेत दिली. यावेळी रेकी मास्टर युगंधरा दुधाळे, जीवन पाटील, गणेश चिलमूर उपस्थित होते.
      या युनिटच्या माध्यमातून सर्व तपासण्यांची सोय आकर्षक सवलतीच्या दरामध्ये एकाच छताखाली उपलब्ध केली आहे. तसेच अंथरुणावर झोपलेल्या रुग्णांना घरी जाऊन तपासणी पासून ते औषध देण्यापर्यंतची सोयही याठिकाणी केली गेली आहे. या युनिटचा प्रमुख उद्देश कोणताही आजार होण्याआधी त्याची प्रतिबंधात्मक काळजी घेणे, दीर्घकालीन आजार उदाहरणार्थ मधुमेह, उच्च रक्तदाब, थॉयराईड ,संधिवात, मानसिक आजार, पी-सी-ओ-डी, वंधत्व, दातांचे व हिरड्यांचे आजार तसेच या आजारांपासून होणाऱ्या इतर समस्या टाळण्यासाठी अचूक निदान करून वेळेत मार्गदर्शनाने उपचार करणे तसेच सध्या डब्ल्यूएचओ प्रमाणे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस ही खूप गरजेचे आहे. त्यामुळे रुग्णाची इच्छाशक्ती वाढते रुग्णांचा सकारात्मक दृष्टिकोन वाढत जातो आणि त्यामुळे तो रुग्ण मानसिकदृष्ट्या खंबीर होऊन कोणत्याही आजारावर मात करू शकतो, त्यासाठी मेडिकल अँस्ट्रोलॉजी ओ.पी.डी सुरू केली असल्याचे डॉ. शितोळे यांनी सांगितले.
    त्यामध्ये रेकी आणि टॅरो कार्ड मार्गदर्शन रेकी मास्टर युगंधरा दुधाळे या देणार आहेत. तसेच मधुमेहमुळे डोळ्यांच्या समस्यांचे प्रमाण किती आहे याची तपासणी करण्यासाठी नेत्ररोग तज्ञ डॉ. माने यांचे मार्गदर्शन मिळणार आहे. तसेच बालरोग विभाग आणि स्त्रीरोग विभागही याठिकाणी कार्यरत असून या युनिटच्या माध्यमातून मधुमेह डोळ्यांचे शिबिर मधुमेहमुळे पायाचा बधिरपणा, मधुमेह दातांची इजा, मधुमेह स्त्रियांचे आजार तसेच मधुमेह बालकांचे आजार तसेच रेकी आणि कुंडलिनी योगा कोर्सेस शिबिराच्या माध्यमातून मार्गदर्शन केले जाणार आहे.

Leave a Reply

Your email address will not be published.

error: Content is protected !!