कोल्हापूर • प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टीच्यावतीने बिंदू चौक येथील जिल्हा कार्यालयात भारत देशाचा ७५वा अमृत महोत्सवी स्वातंत्र्य दिन उत्साहात संपन्न झाला.
भाजपा जेष्ठ कार्यकर्ते राजू बद्दी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यानंतर सर्व पदाधिकारी व कार्यकर्ते यांच्या उपस्थितीमध्ये सामुहिक राष्ट्रगान म्हणून तिरंगा ध्वजास वंदन करण्यात आले. याप्रसंगी भाजपा कार्यालयात उपस्थित पदाधिकारी व कार्यकर्त्यांसमोर डॉ. गुरव, सुषमा गर्दे, भाजपा जिल्हाध्यक्ष राहूल चिकोडे, भाजपा प्रदेश कार्यकारणी सदस्य महेश जाधव यांनी मनोगत व्यक्त केले.
यावेळी सरचिटणीस दिलीप मेत्रीणी, हेमंत आराध्ये, गणेश देसाई, विजय खाडे, दिग्विजय कालेकर, आशिष कपडेकर, संदीप कुंभार, सचिन तोडकर, गायत्री राऊत, विद्या बनछोडे, चिनार गाताडे, प्रीतम यादव, शुभांगी चितारे, विराज चिखलीकर, विवेक वोरा, हर्षांक हरळीकर, विशाल शिराळकर, आजम जमादार, अरविंद वडगांवकर, सुधीर बोलवे, राजाराम नरके, सचिन सुतार, अप्पा लाड, गौरव सातपुते, महादेव बिरजे, प्रवीणचंद्र शिंदे, ओंकार घाटगे, नाजीम आत्तार, प्रकाश घाटगे, भार्गव परांजपे, महेश यादव यांच्यासह भाजपा पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.